क्रेडिट कार्डच्या बिलाने परेशान झाला आहात? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी |How to reduce credit card bill tips in marathi

मित्रांनो क्रेडिट कार्ड (credit card) मुळे आपल्या अनेक समस्या या सुखकर झाल्या आहेत. क्रेडिट कार्डद्वारे आपण सहज पेमेंट करू शकता. अशा परिस्थितीत आपण काहीही विचार न करता कुठेही क्रेडिट कार्डचा वापर करतो. कारण कार्डची लिमिट ही 50 ते 1 लाख रुपये पर्यंत असते. पण जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल येते तेव्हा आपण टेन्शनमध्ये येतो. तेव्हा सुचत नाही काय करावं. अशा स्थितीत प्रश्न पडतो की आता ही रक्कम कशी भरायची? जर आपण वेळेवर बिल भरले नाही तर हळूहळू व्याज वाढते. अश्या वेळेस काय केलं पाहिजे आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

क्रेडिट कार्डच्या बिलाने परेशान झाला आहात? मग ‘या’ टीप्स तुमच्यासाठी |How to reduce credit card bill tips in marathi

कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट रिडीम करा

जेव्हा आपण क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करतो तेव्हा आपल्याला विविध प्रकारचे कॅशबॅक आणि बक्षिसे मिळतात. आपण ते बक्षीस रिडीम करू शकतो. अनेक बँका ग्राहकांना रिडीम पॉइंट्स वापरून क्रेडिट कार्ड बिल भरण्याची सुविधा देतात. जर तुमचे क्रेडिट कार्ड बिल आधीच तयार झाले आणि हे पॉईंट नंतर जमा झाले तर तुम्ही हे पॉइंट वापरू शकणार नाही.

क्रेडिट कार्डवर EMI पर्याय

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल EMI द्वारे देखील भरू शकता. बिले भरण्याचा हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. यावर 15 टक्के ते 22 टक्के व्याज आकारले जाते. यासोबतच प्रीपेमेंटचा खर्चही त्यावर लावला जातो. तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवेद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर EMI सुविधा सुरू करू शकता.

कर्ज टॉप-अप

तुमच्याकडे लोन टॉप-अपचीही सुविधा आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेडही करू शकता. सामान्यतः बँक तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतचे टॉप अप देते. तुम्ही 15 वर्षांच्या आत घेतलेला टॉप-अप तपासू शकता. बँक तुमच्याकडून टॉप-अप कर्जावर व्याज आकारते. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात.

जर तुम्ही कोणतेही टॉप अप घेतले असेल तर तुम्ही पैसे वाचवून दर महिन्याला ते भरावे. जेणेकरून तुम्ही एका वर्षाच्या आत पैसे परत कराल. हे तुम्हाला अधिक व्याज देण्यापासून देखील वाचवेल.

हे सुध्दा वाचा:- रेगुलर प्रीमियमवर टर्म प्लॅन किंवा सिंगल टर्म प्लॅन, कोणता प्लॅन चांगला आहे?

गुंतवणूक योजनेतूनही कर्ज घेता येते

जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्ही त्यातूनही कर्ज घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही सोन्याच्या बदल्यात पैसेही घेऊ शकता. हा एक प्रकारचा वैयक्तिक कर्ज आहे. हे निधीची किंमत कमी करते. हे कर्ज तुम्हाला डिजिटल पद्धतीने लवकर मिळते. मित्रांनो या टीप्स तुम्हाला बिनकामाच्या वाटत असल्या तरी या टीप्स खूप कामाच्या आहेत.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button