मित्रांनो टेक कंपनी Google ची ईमेल सेवा Gmail प्रत्येक कार्यरत युजर्सद्वारे वापरली जाते. मात्र, या प्लॅटफॉर्मवर सायबर हॅकिंगचा धोकाही सर्वाधिक आहे. प्रत्येक जीमेल(Gmail) युजर्सला भरपूर मेल येणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
दरम्यान काहीवेळा कामाच्या मेलमध्ये असे मेल असतात, जे फिशिंग, मालवेअर आणि सायबर हॅकिंगसाठी हॅकिंगशी संबंधित असतात. अशा मेल्स ओळखणे युजरसाठी अवघड काम आहे.
Gmail वर सायबर अटॅकला बळी पडू नका, या महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा |How to protect gmail account from hackers in Marathi
Google ने 15 अब्जाहून अधिक मेल नाकारले आहेत
गुगलने स्वतः आपल्या ऑफिसियल पृष्ठाद्वारे माहिती दिली आहे की ते आपल्या युजर्सना दररोज 15 अब्ज पेक्षा जास्त अवांछित संदेशांपासून संरक्षण करते. Gmail आपोआप 99 टक्के स्पॅम मेल नाकारते. मात्र, असे असूनही सायबर हॅकिंगचा धोका पूर्णपणे टाळता येणार नाही. स्पॅम मेल टाळण्यासाठी जीमेल युजर्सना काही महत्त्वाची माहिती माहित असणे आवश्यक आहे. फिशिंग आणि मालवेअर संबंधित मेलसाठी Google पण काही मार्ग सुचवते.
Google कधीही युजर्सकडून ही माहिती विचारत नाही
- कंपनीच्या म्हणण्यानुसार, युजर्सनी त्यांच्या खात्यांशी संबंधित त्यांचे युजरनाव आणि पासवर्ड शेअर करणे टाळावे.
- त्याचप्रमाणे, युजर्सने त्याचा सामाजिक सुरक्षा क्रमांक शेअर करणे टाळावे.
- युजर्सने कोणत्याही मेलला उत्तर देताना त्याचा बँक खाते क्रमांक, पिन, क्रेडिट कार्ड तपशील, आईची माहिती, जन्मतारीख शेअर करणे टाळावे.
- युजर्सने कोणत्याही अनोळखी मेलमध्ये आढळणाऱ्या अटॅचमेंट्स डाउनलोड करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
हे सुध्दा वाचा:- तुमचं व्हॉट्सॲप स्टेटस फेसबुकवर शेअर करायचं आहे? मग ‘या’ स्टेप्स फॉलो करा
फिशिंग, मालवेअरशी संबंधित मेल शोधण्यासाठी हे काम करा
- युजर्सला फिशिंग, मालवेअरशी संबंधित कोणताही मेल आढळल्यास, काही आवश्यक कारवाई करण्याचा सल्ला दिला जातो.
- अशा मेल्सची त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही कोणत्याही मेलवर बँकिंग माहिती पाठवली असेल, तर तुम्ही बँकेला लगेच कळवू शकता.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_Shala या पेजला नक्की फॉलो करा.