तुम्ही पण उन्हात कार पार्क करता का? जर करत असाल तर त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते? |How To Protect Car From Sun In Open Parking

मित्रांनो पाऊस तर काही पडत नाहिये पण ऊन तर नक्की पडतंय. यामुळे उष्णतेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार मालक असाल आणि तुम्ही तुमची कार बाहेर पार्क करत असाल तर तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमची कार खराब होऊ शकते. चला तर जाणून घेऊया कार उन्हात पार्क केल्याने कोणते नुकसान होऊ शकते.

तुम्ही पण उन्हात कार पार्क करता का? जर करत असाल तर त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते? |How To Protect Car From Sun In Open Parking

यामुळे टायर लवकर खराब होऊ शकतात

तुम्हाला माहिती आहे का की कार चालवताना टायर गरम होतात, त्यानंतर तुम्ही तुमची कार उन्हात उभी केली तर टायरमध्ये आधीच असलेली उष्णता आणखी वाढू लागते. टायरमधील हिट वाढवणे हे तुमच्या कारसाठी चांगले नाही किंवा ती रस्त्याच्या मधोमध फुटू शकते आणि तिचे लाईफही कमी होऊ शकते. म्हणूनच उन्हात गाडी पार्क करणे टाळा त्यामुळे तुमच्या गाडीची लाईफ वाढेल.

इंजिनवर परिणाम होतो

उन्हात कार पार्क केल्यामुळे टायरवरच परिणाम होत नाही तर इंजिनवरही परिणाम होतो. कार चालवताना इंजिन गरम होते हे तुम्हाला माहीत असेलच. अशा परिस्थितीत तुम्ही गाडी उन्हात उभी केली तर इंजिन थंड होण्याऐवजी ते उन्हामुळे गरम होते आणि याचा कारवरही परिणाम होतो आणि यामुळे कारचे आयुष्यही कमी होते. याचबरोबर पिस्टन रिंग खराब होण्याची शक्यता देखील वाढते.

हे सुद्धा वाचा: घरबसल्या कारची बॅटरी बदलायची आहे? मग या खास टिप्स तुमच्यासाठी

केबिन गर्म होते

अशा कडक उन्हात जर तुम्ही तुमची गाडी घराबाहेर पार्क केली तर त्यामुळे गाडीची केबिन देखील गर्म होते. त्यामुळे केबिनमधील रबरी पार्ट्स, प्लॅस्टिक शीट कव्हर यासारख्या गोष्टींचे नुकसान होण्याची शक्यता अधिक वाढते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button