मित्रांनो जेव्हा पण तुम्ही तुमचे खाते उघडण्यासाठी बँकेत जाता तेव्हा तुमचे बचत खाते उघडले जाते. बँक खाती inactive होणे ही सामान्य गोष्ट आहे. निष्क्रिय (inactive) असलेली बहुतांश बँक खाती जुनी बँक खाती असतात. ही बँक खाती अशी असतात जिथे लोकांनी बराच काळ कोणताही व्यवहार केलेला नाही किंवा हे खाते कोणत्याही प्रकारे वापरलेले नाही. अस कस काय घडते आणि आपण ते पुन्हा कसे सुरू करू शकतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
बँक खाते inactive झाले आहे? अशा प्रकारे करा Reactive | How do I activate my dormant bank account?
बँक खाते inactive कसे होते?
जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 12 महिने कोणताही व्यवहार करत नाही तेव्हा खाते निष्क्रिय च्या श्रेणीत येते. जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 24 महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार करत नाही तेव्हा बँकेकडून खाते inactive केले जाते.
बँक खाते तीन भागात विभागलेले असतात. पहिला active, दुसरा inactive आणि तिसरा dormant. बँका असे करतात जेणेकरून फसवणूक आणि तुमच्या खात्याचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर होण्याचा धोका हा कमी होईल.
खाते पुन्हा reactive कसे करावे?
तुम्ही तुमचे बँक खाते सहजपणे पुन्हा reactive करू शकता. ही प्रक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया.
- तुम्हाला यासाठी बँकेला लेखी अर्ज द्यावा लागेल. तुमचे संयुक्त खाते असल्यास, तुम्हाला सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असेल.
- तुम्हाला तुमचे KYC (तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या) डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. यामध्ये पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड आणि ओळखपत्रांचा समावेश असेल.
- आपण किमान एक आर्थिक व्यवहार करणे आवश्यक आहे.
हे सुध्दा वाचा:- निवृत्तीचे नियोजन करताना या 5 योजना बनतील तुमच्या म्हातारपणीचा आधार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही
एक महत्वाची गोष्ट म्हणजे बँक तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे रीएक्टिव्हेशन शुल्क आकारत नाही. तुमचे खाते निष्क्रिय ठेवणे टाळण्यासाठी तुम्ही तुमचे खाते नियमितपणे वापरत आहात याची खात्री करा. ते निष्क्रिय होण्यापासून रोखण्यासाठी दरवर्षी ऑनलाइन किंवा ऑफलाइन व्यवहार करणे आवश्यक आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.