गृह कर्ज वरील व्याजदर वाढले तरीही पर्यायने कमी व्याजदरात मिळू शकतो लोन, त्यासाठी काय करावे लागेल जाणून घेऊया थोडक्यात.

आरबीआय (RBI) अर्थात रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रेपो दरात वाढ केल्यानंतर आता नामांकित बँकांनी होम लोन महाग केले आहेत. तथापि रिझर्व बँकेने तब्बल दोन वेळा रेपो दरात 90 बेसिस पॉईंट ची वाढ केली आहे. त्यामुळेच यावर्षी मे महिन्याच्या पूर्वी गृहकर्जाचा कमाल दर 6.80% होता तो आता वार्षिक 7.70% झाला आहे त्यामुळे आता आधीपासून चालू असलेले कर्ज व नवीन कर्ज अशा दोन्ही परिस्थितीत व्याज वाढलेले आहे.

तुम्हालाही होम लोन कर्ज घ्यायचे असल्यास तसेच तुम्ही तुमच्या चालू असलेल्या होम लोनवर कमी व्याज वाचवू शकतात तसेच नवीन कर्ज घेताना तुम्हाला व्याज दरात काही सूट सहज मिळू शकते कारण अनेक नामांकित बँक सतत काही विशेष ऑफर देत असतात परंतु या विशेष ऑफर मध्ये काही प्रमाणात अटी देखील असतात. परंतु तुम्ही या अटींचे पूर्णपणे पालन केल्यास बँक तुम्हाला इतरांपेक्षा कमी व्याजदराने कर्ज देईल.

त्यासाठी तुम्हाला या अटींचे काटेकोरपणे पालन करावे लागेल

क्रेडिट स्कोअर सुधारा

स्वस्त कर्ज मिळण्यासाठी क्रेडिट कार्ड स्कोर खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे स्वस्त कर्ज मिळण्यासाठी तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुम्ही होम लोन घेणे काही दिवस टाळा आणि सर्वप्रथम तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारा. हे केलास तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्यास मदत होईल. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज न मिळाल्याने तुम्ही तुमची क्रेडिट हिस्टरी तयार केली नसेल तर तुम्ही सर्वात प्रथम क्रेडिट कार्ड किंवा एखादे वैयक्तिक कर्ज घेऊन तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर विकसित करू शकता. जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर 750 च्या वर जाईल तेव्हा तुम्ही गृह कर्जासाठी (Home Loan) अर्ज करू शकता.

गृह कर्जासाठी (Home Loan) महिलांना सवलत मिळते

अनेक नामांकित बँका महिलांना कमी व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देतात. होम लोन घेताना या विषयावरही संशोधन करा. पुरुष देखील कुटुंबातील महिलांसोबत संयुक्त कर्ज घेऊ शकतात. तसेच पती-पत्नी, आई मुलगा व वडील-मुलगी देखील संयुक्तपणे गृह कर्ज घेऊ शकतात. कमी व्याजदरात गृह कर्ज मिळण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. देशातील अनेक राज्ये महिलांच्या नावावर घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी नोंदणी शुल्कात सूट देखील देतात.

रिफायनान्सिंग सवलतीचा लाभ घ्या

नवीन ग्राहकांना विशेष आकर्षित करण्यासाठी नामांकित बँका व्याजदरात विशेष सवलत देतात. जर तुमचा सध्याचा गृह कर्ज दर खूप जास्त असल्यास तुम्ही तो रिफायनान्सिंगद्वारे कमी करू शकता. पण तुम्हाला बँकांकडून या संदर्भात दिल्या जाणाऱ्या सवलतीची माहिती काढावी लागेल. तसेच ती माहिती योग्य पद्धतीने जाणून घ्यावी लागेल. तसेच रिफायनान्सिंग बाबत इतर बँकांशी बोलून तुम्ही याबाबत जाणून घेऊ शकता. विशेष म्हणजे रिफायनान्सिंग बाबत ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे बँका फायनान्सिंग बाबतीत सर्व ग्राहकांना सवलत देऊ शकत नाही. ती सूट काही प्रकारच्या अटींच्या अधीन आहे.

कर्जाची रक्कम कमी ठेवा

गृह कर्ज घेताना गृह कर्जाची रक्कम जितकी जास्त प्रमाणात असेल तितका गृहकर्जांचा व्याजदर जास्त असेल. जर तुम्ही 30 लाख रुपयापर्यंत गृह कर्ज घेतले तर तुम्हाला सर्वात कमी व्याज द्यावे लागेल. जर तुम्ही यापेक्षा जास्त गृह कर्ज घेणार असाल तर त्या पद्धतीने व्याजदर वाढतो. या सर्व समस्यापासून वाचवण्यासाठी गृह कर्ज घेताना गृह कर्जाची रक्कम अत्यंत काळजीपूर्वक ठरवावी. जर तुम्ही रिफायनान्स करत असाल तर तुम्हाला छोट्या प्रकारच्या कर्जावर चांगला व्याजदर मिळू शकेल.

प्री अप्रव्ह ऑफरबद्दल जाणून घ्या

जर तुम्ही नवीन कर्ज असाल तर आधी तुमचा बँकेने तुमच्यासाठी तयार केलेली प्री अप्रव्ह ऑफर तपासा. प्रत्येक नामांकित बँक आपल्या विशिष्ट विशेष ग्राहकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत काही सवलतीत गृह कर्ज व्याजदर देते. तसेच तुमचे होम लोन चालू असल्यास तुमचे कर्ज रेपो रेट, एमसीएलआर (MCLR) किंवा बेस्ट रेटच्या तुलनेत बेंच मार्क आहे की नाही हे तपासा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button