खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits of eating dates in marathi

पिवळट-सोनेरी किंवा काळपट-लाल असा मांसल खजूर आहारामध्ये गोडी निर्माण करतो. खजूर पौष्टिक, शीतल, तृप्तीदायक, परंतु पचण्यास जड आहे.

खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits of eating dates in marathi

  • खजूर रेचक म्हणून प्रभावी ठरतो. खजूर रात्री पाण्यात घालून सकाळी चांगला कुस्करून घ्यावा व ते पाणी प्यावे म्हणजे शौचास साफ होते. ‘खजुरासव’ संग्रहणीवर उपयोगी असते.
  • खजूर रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी नीट कुस्करून घ्यावा व त्यात मध घालून ते पाणी आठ-दहा दिवस घेतल्याने शौचास साफ होते, मलशुद्धी होते, शरीराचा दाह दूर होतो तसेच आमवातावरही प्रभावी फायदा होतो.
  • खजूराच्या पाण्यात चमचाभर मेथी घालून ते पाणी उकळून प्यायल्यामुळे मुळे कंबरदुखीवर फायदा होतो.
  • मध व खजूर खाल्ल्याने रक्तपित्त बरे होते. खजूर खाऊन त्यावर गरम दूध तूप घालून प्यायल्याने शरीराचा अशक्तपणा दूर होतो.
  • थंडीच्या दिवसात शरीराचे बल वाढवण्यासाठी सकाळी तुपात परतलेला खजूर खावा आणि त्यावर साखर व वेलची घातलेले गरमागरम दूध प्यावे.
  • दररोज थोडा थोडा खजूर गरम पाण्याबरोबर घेतल्याने कफ पातळ होतो.. सर्दी, खोकला, दमा या विकारांवर उपयोगी पडतो.
  • खजूर, चिंचेचा कोळ, दोन-चार द्राक्षे कुटून मिश्रण करावे व त्यामध्ये चवीनुसार थोडी मिरची, आले, मीठ व साखर घालून त्यांची चटणी करावी. अरुची, अपचन यांवर ती गुणकारी ठरते.खजूर कफहारक असल्याने क्षयरोग्यांसाठी त्याचे सेवन हितावह ठरते. खजुराची बी तृषाशामक असल्याने ती तोंडामध्ये ठेवल्यास ओलावा निर्माण करते. तोंडाला कोरड पडत असेल तर खजूर ‘बी’ सकट तोंडामध्ये ठेवावा.
  • खजूर अत्यंत शीतल, कफहारक, तृषाशामक, वीर्यवर्धक, बलवर्धक, पचण्यास जड, रूचीकारक, स्निग्ध असतो. उलटी, कफ, अतिसार, वातपित्त, रक्तपित्त, खोकला, तहान, भूक, क्षय यांमुळे होणाऱ्या विकारांवर मात करतो. * खजुरामध्ये ए, बी व सी जीवनसत्त्व असते. खजूर बलकारक, स्वास्थवर्धक व रेचक असल्याने शरीरावर योग्य ते नियंत्रण ठेवतो.

Note- ‘अग्निमांद्य’ हा खजुराचा स्थायी घटक असल्याने पचनशक्तिचा विचार करूनच खाल्ला पाहिजे अन्यथा अतिरेकी सेवनामुळे खजूर पचवणे कठीण जाते तसेच गुदाशयाच्या अवयवांना सूज येऊन शौचातून रक्त पडण्याचा संभवही असतो.

Note -2 – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ