नोकरीच्या ठिकाणी सलग 5 वर्षे पूर्ण नसतील तर, तुम्हाला मिळू शकते ग्रॅज्युटी, कसे ते पहा

प्रत्येक नोकरदार वर्गासाठी पीएफ (PF) आणि ग्रॅज्युएटी रुल अत्यंत महत्त्वाची असते. कारण या स्वरूपात मिळालेली रक्कम सेवावृत्तीनंतरच्या आयुष्याच्या आर्थिक आधार असतो. सर्वसामान्यपणे खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दर महिना वेतन स्वरूपात मिळणारी रक्कम रिटायरमेंट नंतर बंद होते. त्यामुळे पीएफ ग्रॅज्युटीच्या रकमेचे नियोजन विशेष आवश्यक ठरते. खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांच्या मनात ग्रॅज्युटी बद्दल अनेक तर्कवितर्क असतात. तसेच त्यात सलग किती कालावधीपर्यंत काम केल्यानंतर ग्रॅज्युटी मिळते हा मुख्य प्रश्न प्रामुख्याने असतो.

नोकरीच्या ठिकाणी सलग 5 वर्षे पूर्ण नसतील तरी तुम्हाला मिळू शकते ग्रॅज्युटी | What happens to gratuity after resignation before 5 years

ग्रॅज्युटीचा लाभ मिळवण्यासाठी कामाचा कालावधी किती असायला हवा याचा उल्लेख ग्रॅज्युटी कायद्यामध्ये स्पष्टपणे केलेला आहे. याखेरीज ग्रॅज्युटीचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्याला कशाप्रकारे दिला जातो. या संदर्भात देखील काही नियम आहेत. ग्रॅज्युटीचा अर्थात म्हणजे कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण केलेला सेवेच्या बदल्यात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्या प्रति व्यक्त केलेली एक प्रकारची कृतज्ञता होय.

मासिक वेतन आणि ग्रॅज्युएटी कायदा देशातील सर्व कारखाने, तेल क्षेत्र, बंदरे, खाणी आणि रेल्वे खाते यांना लागू आहे. ग्रॅज्युटीचा लाभ 10 पेक्षा जास्त कर्मचारी असणारी दुकाने आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना होतो. कोणत्याही कंपनीत सलगपणे 5 वर्ष काम करणारी कर्मचारी ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतात. परंतु काही विशिष्ट प्रकरणांमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या काम प्राप्तीच्या सेवेवरही ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो. कायद्याच्या कलम-2A मध्ये सातत्याने काम करणे याची व्याख्या स्पष्टपणे नमूद आहे. यानुसार पाच वर्ष काम केले नाही तरी अनेक कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ मिळू शकतो.

भूमिगत खाणींमध्ये काम करणारे कर्मचारी सलग्न कंपनीत सलग 4 वर्ष 190 दिवस कार्यरत असतील तरी त्यांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळतो. इतर संस्थांमध्ये काम करणारी कर्मचारी 4 वर्ष 240 दिवस म्हणजे 4 वर्ष आठ महिने संबंधित कंपनीत काम करत असतील तर ते ग्रॅज्युटी साठी पात्र ठरतात.

कोणत्याही कर्मचाऱ्याला कमाल 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅज्युएटीची रक्कम मिळू शकते. ग्रॅज्युटीची रक्कम निश्चित करण्यासाठी एक सोपी पद्धत वापरली जाते. या पद्धतीच्या मदतीने ग्रॅज्युएटीची रक्कम समजून शकते. ही पद्धत खालील प्रमाणे आहे.

एकूण ग्रॅज्युएटीची रक्कम = (एकुण वेतन) × (15× 26) × (कंपनीत किती वर्ष काम केले तो कालावधी)

उदाहरणार्थ-

समजा तुम्ही एका कंपनीत चालक सात वर्षे काम केले आहे. तेव्हा तुमचे एकूण वेतन (मूळ वेतन आणि महागाई भत्ता मिळून) 35 हजार रुपये आहे. तर ते कॅल्क्युलेशन असे होईल.

(35000) × (15×26)× (7)= 141346 रूपये.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएटीच्या रकमेचा अंदाज घेऊन आर्थिक नियोजन करू शकता.

प्रायव्हेट सेक्टर अर्थात खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. भारत सरकारने देखील ग्रॅज्युएटीच्या नियमात काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्यावर आजपर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंतच्या नियमानुसार ग्रॅज्युएटीचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एका कंपनीत सलगपणे 5 वर्ष काम करणे आवश्यक असते. पण भारत सरकार हा कालावधी 3 वर्षापर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भारत सरकारचा हा निर्णय झाला तर त्याचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button