तुमच्यासाठी कोणते कर्ज चांगले आहे? पर्सनल लोन की सोने तारण लोन? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Gold loan vs personal loan which loan is best for you

मित्रांनो संकट हे कधी सांगून येत नाही. एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास आपल्याला किती पैसे लागतील याबद्दल आपण सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत कर्ज आपल्याला मदत करते. आपण अनेक वित्तीय संस्थांसह देशातील सर्व बँकांकडून कर्ज घेऊ शकतो. कर्जाचे अनेक प्रकार असले तरी आज आपण वैयक्तिक कर्ज ( Personal loan) आणि सुवर्ण कर्ज (Gold loan) याबद्दल आज जाणून घेणार आहोत.

तुमच्यासाठी कोणते कर्ज चांगले आहे? पर्सनल लोन की सोने तारण लोन? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Gold loan vs personal loan which loan is best for you

आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, बँक तुम्हाला तेव्हाच कर्ज देते जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर खूप चांगला असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही किंवा तुम्हाला कर्जावर जास्त व्याज द्यावे लागते. जर तुम्ही यापूर्वीही कर्ज घेतले असेल तर बँक तुमच्या कर्जाच्या हिस्ट्रीच्या आधारेच कर्ज देते. जर तुम्ही बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही गोल्ड लोन देखील घेऊ शकता.

आजच्या काळात हा देखील एक चांगला पर्याय मानला जातो. वैयक्तिक कर्जापेक्षा हे लोन खूपच स्वस्त आहे. कारण तुम्हाला तुमचे सोने गहाण ठेवावे लागते आणि त्यावर तुम्हाला कर्ज मिळते. चला तर जाणून घेऊया (difference between gold loan and personal loan) कोणते कर्ज सर्वोत्तम आहे.

पर्सनल लोन किंवा गोल्ड लोन कोणत सर्वोत्तम आहे?

  • बरेच लोक गोल्ड लोनला चांगल म्हणतात. तर काही लोक वैयक्तिक कर्जला चांगलं म्हणतात. पर्सनल लोनमध्ये तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही.
  • तर गोल्ड लोनमध्ये तुम्हाला तुमचे सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात. पर्सनल लोनमध्ये तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नसली तरी यासाठी तुम्हाला अनेक प्रकारची कागदपत्रे जमा करावी लागतील.
  • तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि इतर अनेक पुरावे बँकेत सादर करावे लागतील. गोल्ड लोनमध्ये अशी कागदपत्रे सादर करावी लागत नाही.
  • वैयक्तिक कर्जामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा देण्याची गरज नाही. जेव्हा बँक तुम्हाला वैयक्तिक कर्ज देते. तेव्हा ती तुमच्या उत्पन्नाची पडताळणी करते.
  • वैयक्तिक कर्जामध्ये बँक तुमच्याकडून प्रक्रिया शुल्क आकारते. प्रत्येक बँकेचे प्रोसेसिंग फी वेगवेगळे असते. बँक ग्राहकाकडून 0.5% ते 1% पर्यंत प्रक्रिया शुल्क आकारते.
  • गोल्ड लोनमध्ये तुम्हाला पुरावा म्हणून कोणतेही कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. यामुळे कोणतीही प्रक्रिया शुल्क समाविष्ट नाही.

हे सुध्दा वाचा:- Home loan चे किती प्रकार आहेत? आणि कोणत्या लोनमध्ये अधिक फायदा आहे? जाणून घ्या

अनेक ग्राहक गोल्ड लोनला प्राधान्य का देतात?

  • तुम्हाला कमी वेळेत गोल्ड लोन मिळेल. तर पर्सनल लोन मिळण्यासाठी खूप वेळ लागतो.
  • हे कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा खूपच स्वस्त आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असला तरीही तुम्हाला हे कर्ज मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही.
  • तुम्ही या कर्जाची परतफेड EMI च्या स्वरूपात किंवा एकरकमी नंतर करू शकता. याशिवाय बँक तुमच्याकडून या कर्जावर मासिक व्याज आकारते.
  • तुम्ही 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे सोने कर्ज घेऊ शकता.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button