Home loan चे किती प्रकार आहेत? आणि कोणत्या लोनमध्ये अधिक फायदा आहे? जाणून घ्या |How many types of home loans in marathi

मित्रांनो स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. या महागाईच्या युगात स्वत:चे घर बांधणे खूप अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत गृहकर्ज आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरते. सध्या बँकांबरोबरच वित्तीय संस्थाही ग्राहकांना गृहकर्ज देत आहे. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, सर्वात पहिले गृह कर्ज बद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच कोणत्या प्रकारचे गृहकर्ज आहे आणि कोणत home loan फायदेशीर राहील.

Home loan चे किती प्रकार आहेत? आणि कोणत्या लोनमध्ये अधिक फायदा आहे? जाणून घ्या |How many types of home loans in marathi

गृहकर्जाचे किती प्रकार आहेत?

बँक ग्राहकांना प्रामुख्याने दोन प्रकारचे कर्ज देते. घर खरेदी करण्यासाठी तुम्ही बँकेकडून गृहखरेदी कर्ज (Home purchase loan) घेऊ शकता. जर तुम्ही स्वतःचे घर बांधत असाल तर तुम्ही गृहनिर्माण कर्ज (home construction loan) देखील घेऊ शकता. याशिवाय बँक तुम्हाला गृह विस्तार कर्ज (home extension loan) देखील देते. सध्याचे घर मोठे करण्यासाठी हे कर्ज घेतले जाते.

जर तुमचं घर एक मजली असेल आणि त्याला आता तीन मजली बनवायचे असेल तर, तुम्ही हे कर्ज घेऊ शकता किंवा तुम्ही प्लॉट खरेदी केला असेल तरी सुध्दा तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. या प्रकारच्या कर्जाला जमीन खरेदी कर्ज (Land purchase loan) म्हणतात. तुमचे घर जुने झाले आहे आणि तुम्हाला ते दुरुस्त करायचे आहे तर तुम्ही त्यासाठी गृह सुधारणा कर्ज घेऊ शकता. जेव्हा बँक आपल्याला अनेक प्रकारची कर्जे देते. तेव्हा आपण गोंधळून जातो की आपल्यासाठी कोणते कर्ज सर्वोत्तम आहे?

गृहकर्जामध्ये तुमच्यासाठी कोणते कर्ज सर्वोत्तम आहे?

  • तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर तुमच्या गरजेनुसार कर्ज घ्या.
  • यासोबतच बँक तुम्हाला कर्जावर किती दराने व्याज देत आहे हेही लक्षात ठेवावे. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात.
  • अशा स्थितीत सखोल चौकशी करूनच कर्ज घ्या.
  • ऑनलाइन व्यतिरिक्त तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन देखील कर्जाबद्दल जाणून घेऊ शकता.
  • जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा भविष्याचा प्रश्नही आपल्या मनात येतो. सर्वात मोठा प्रश्न येतो की एखादी व्यक्ती किती गृहकर्ज घेऊ शकते?

हे सुध्दा वाचा:- Car insurance क्लेम करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाही तर क्लेम महागात पडू शकते

गृह कर्जाची मर्यादा किती आहे?

  • प्रत्येक व्यक्ती एका वेळी एकच गृहकर्ज घेऊ शकते.
  • कधीकधी परिस्थिती अशी असते की तुम्ही दुप्पट कर्ज देखील घेऊ शकता.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तेव्हाच बँक तुम्हाला दोन कर्ज देते. यासोबतच तुमचा उत्पन्नाचा स्रोतही मजबूत असेल तरच बँक दुसरे कर्ज देते.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुटुंबातील अन्य सदस्यासोबत संयुक्त गृहकर्जही घेऊ शकता.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button