पैशाची नितांत गरज असताना कोणते कर्ज निवडावे, पर्सनल लोन की गोल्ड लोन? | Difference between personal loan and gold loan in marathi

आपल्याला आर्थिक अडचणीत पैशाची गरज भासल्यास सर्वात प्रथम कर्ज हा पर्याय समोर येतो. त्यामुळे कर्ज घ्यायचे असल्यास कर्जामधील सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पर्सनल लोन.

पर्सनल लोन सध्या सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने लोक आर्थिक संकटात पर्सनल लोनचा आधार घेतात. मात्र पर्सनल लोन सोबतच गोल्ड लोनची मागणी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पर्सनल लोन आणि गोल्ड लोन यापैकी सर्वोत्तम पर्याय कोणता याबाबत आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत.

पैशाची नितांत गरज असताना कोणती कर्ज निवडावे पर्सनल लोन की गोल्ड लोन? |Difference between personal loan and gold loan in marathi

तुम्ही जर पर्सनल लोन (personal loan) घेत असाल तर तुम्हाला तुमच्याकडील काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. जर तुम्ही गोल्ड लोनचा पर्याय स्वीकारत असाल तर यापैकी तुमच्याकडील सोने तारण म्हणून राहते. म्हणजेच सोने तारण ठेवण्याच्या बदल्यात तुम्हाला कर्ज मिळत आहे.

पर्सनल लोन साठी तुम्ही अर्ज केल्यास तुम्हाला बरीच कागदपत्रे द्यावी लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाचा दाखला, अधिवासाचा पुरावा आणि इतर पुरावे. पर्यायी गोल्ड लोनमध्ये ही सर्व कागदपत्रांची परवड करावी लागत नाही.

प्रक्रिया शुल्क काय असते?

पर्सनल लोनच्या संदर्भात बँकांना कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी दिली जात नाही. पर्सनल लोन संबंधित व्यक्तीचे उत्पन्न पडताळणीचे कागद तपासले जातात. त्यामुळे परिणामी नामांकित बँका पर्सनल लोन घ्यायचे असल्यास प्रक्रिया शुल्क आकारतात.

हे सुध्दा वाचा:- घर विकताना घरमालकांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्यात

प्रक्रिया शुल्क 0.5 टक्के ते 1 टक्के असू शकते. गोल्ड लोनच्या संदर्भात संबंधित कर्जदार व्यक्तीला अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा, कागदपत्रे दाखवण्याची आवश्यकता नाही. नामांकित बँका त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या वापर सुरक्षितता म्हणून करतात. त्यामुळे परिणामी गोल्ड लोनमध्ये कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.

गोल्ड लोनची प्रोसिजर काय आहे?

पर्सनल लोन घ्यायची असल्यास संबंधित व्यक्तीला उत्पन्नाच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रे द्यावे लागतात त्यामुळे पर्सनल लोनची प्रक्रिया दीर्घ आणि वेळ काढू आहे.

परिणामी त्याच वेळी गोल्ड लोनची प्रक्रिया सोपी आहे. संबंधित कर्जदार व्यक्ती अनेक फॉर्मवर साक्षरी करतात आणि त्यांच्याकडील सोन्याच्या मौल्यवान वस्तू सिक्युरिटी म्हणून सादर करतात. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.

कर्जाची रिपेमेंट कशी केली जाते?

पर्सनल लोन पेक्षा गोल्ड लोनचे रीपेमेंट पर्याय अधिक सुलभ आहेत. गोल्ड लोन घेणारे कर्ज परतफेडच्या विविध पद्धतीमधून निवडू शकतात. तसेच गोल्ड लोन तुमची रिपेमेंट करण्याची क्षमता वाढवण्यासाठी अनेक पर्याय देतात. त्यामुळे परिणामी तुम्हाला तुमच्याकडील कर्जाची परतफेड करण्याची उत्तम संधी मिळू शकते.

या दोन्ही लोनचे व्याजदर किती असेल?

गोल्ड लोनच्या तुलनेत पर्सनल लोन वरील व्याजदर खूप जास्त आहे. तसेच पर्सनल लोन असुरक्षित आहे. पण गोल्ड लोनचा पर्याय निवडल्यास ते अधिक सुरक्षित कर्ज आहे. त्यामुळे या दोन प्रकारच्या कर्जांमध्ये व्याजदरांमधील फरका महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे आहेत.

Note 2 – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button