दररोज पहाटे जाग येण्यासाठी काही निवडक महत्त्वाचे नियम | 4 Tricks for Waking Up Early in the Morning

रात्री आपण लवकर झोपल्यास व त्यानंतर पहाटे लवकर उठल्यास हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. पहाटे लवकर उठल्यामुळे आपल्या संपूर्ण दिवस उत्साह व त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा राहते.

आपल्यातील अनेकांना पहाटे उठावेसे वाटते, फिरायला जावेसे वाटते, पण पहाटे जागत येत नाही. त्यामुळे नियमित पहाटे उठण्याची सवय कशी लावावी. यासाठी स्वतःला कसे प्रोत्साहित करावे. याबद्दल काही विशेष निवडक नियम या पोस्ट मध्ये जाणून घेऊयात.

दररोज पहाटे जाग येण्यासाठी काही निवडक महत्त्वाचे नियम |4 Tricks for Waking Up Early in the Morning

पहाटे उठण्यासाठी लवकर झोपा

पहाटे उठण्यासाठी रात्री योग्य वेळी लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. आपण उशिरा झोपल्यास आपल्या शरीराचे घड्याळाचे नियोजन बिघडते. यामुळे दुपारी झोप घेण्याचे टाळा तसेच रात्री अंथरुणाला पाठ ठेवल्यानंतर टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर असा कुठलाही स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर ठेवू नका. पहाटे लवकर जाग येण्यासाठी आपल्याला किमान 8 ते 9 तास झोप घेणे आवश्यक आहे.

आपली इच्छाशक्ती मजबूत करा

दररोज पहाटे लवकर उठण्यासाठी ठाम निश्चय करा. आपल्यातील अनेक जण अलार्म बंद करून झोपतात. हे टाळण्यासाठी आपली प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा:- यश मिळवून देणाऱ्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

रोज हलका आहार घ्या

जर तुम्हाला पहाटे लवकर उठायचे असेल तर तुम्ही सर्वप्रथम हलका आहार घ्यायला प्राधान्य द्या. याच कारण की, तुम्ही जर जास्त प्रमाणात आहार घेतल्यास जडपणा येतो. परिणामी झोपही नीट लागत नाही. त्यामुळे उशिरा झोपल्यामुळे सकाळी उशिरा जाग येते. रात्री झोपण्याच्या तीन तास आधी भोजन घेणे अतिउत्तम. रात्री विशेषतः चहा कॉफी पिण्याची टाळा.

आपल्यातील भीती दूर करा

आपल्यातील काही लोकांना असे वाटते की, दररोज सकाळी नियमित लवकर उठणे खूप अवघड जाईल. पण सकाळी लवकर उठणे फक्त सुरुवातीची काही दिवस अवघड वाटते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात धीर धरा आणि स्वतःला वेळ द्या. त्यानंतर आपल्या शरीराचे घड्याळ दोन आठवड्यात पूर्णपणे रिसेट होते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button