जागतिक अनुवाद दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | International Translation Day information in marathi

आज जगभरात आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन म्हणजेच भाषांतर दिवस साजरा करण्यात येतो. भाषा ही व्यावसायिकांना त्यांच्या कार्यासाठी सन्मानित करण्यासाठी आणि अनुवादाचे जागतिक महत्त्व मान्य करण्यासाठी दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.चला तर जाणून घेऊया या खास दिवसाची सुरुवात कधी आणि का झाली?

जागतिक अनुवाद दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? | International Translation Day information in marathi

30 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ?

दरवर्षी हा दिवस सेंट जेरोम (saint jerome) यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 30 सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. सेंट जेरोम हे बायबल चे भाषांतरकार आहेत जे भाषांतकारकाचे संरक्षण संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या स्मरणार्थ हा खास दिवस साजरा केला जातो.

कधी झाली होती International Translation Day दिनाची सुरुवात?

आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस हा FIT द्वारे मान्यताप्राप्त 1991 मध्ये जगभरातील भाषांतर समुदायाची एकता दर्शवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला.इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर (FIT) ची स्थापना 1953 मध्ये झाली.

1991 मध्ये एफआयटी (FIT) ने जगभरातील भाषांतर समुदायाची ओळख वाढवण्यासाठी या दिनाची सुरुवात केली. त्यानंतर 24 मे 2017 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 30 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन (भाषांतर दिवस) म्हणून घोषित केला.त्यादिवसापासून भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी हा खास दिवस जगभरात साजरा केला जातो.

यावर्षीची थीम काय आहे?

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाची थीम “A world without Barriers” आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button