12वी नंतर राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, मग ही माहिती तुमच्यासाठी |Career in political science after 12th

मित्रांनो राज्यशास्त्र (Political Science) हा खूप मोठा विषय आहे. यामध्ये करिअर करण्यासाठी राजकारण आणि नागरिकशास्त्रात रस असणे महत्त्वाचे आहे. बारावीनंतर राज्यशास्त्रात पदवी घेऊन तुम्ही तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकता (Career Options after 12th).

राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे बहुतेक उमेदवार हे UPSC परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करू शकतात (UPSC परीक्षा तयारी टिप्स). तुम्हीही राज्यशास्त्र हा तुमचा मुख्य विषय म्हणून अभ्यास करून त्यात करीअर करण्याचा विचार करत असाल, तर मित्रांनो फील्डला खूप मोठा वाव आहे (career scope in political science). आज आपण career in political science बद्दलचे काही उत्तम पर्याय बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर तुमचे भविष्य घडवू शकता.

12वी नंतर राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, मग ही माहिती तुमच्यासाठी |Career in political science after 12th

राजकीय शास्त्रज्ञ (Political scientist)

राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर सरकारी व्यवस्थेच्या विविध पैलूंचा आणि सरकारी धोरणांचा राजकीय शास्त्रज्ञाच्या भूमिकेत होणारा परिणाम यांचा अभ्यास करता येतो. राज्यशास्त्रज्ञ होण्यासाठी राज्यशास्त्रात एमए पदवी किंवा पीएचडी घेणे आवश्यक आहे.

पत्रकारिता (Journalism)

मित्रांनो मीडिया राजकारणाच्या सर्वात जवळ आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. राज्यशास्त्र शिकणारे विद्यार्थी पत्रकार बनून चांगले करिअर करू शकतात. पत्रकारिता केल्यानंतर संपादक, राजकीय अँकर आणि वार्ताहर होऊ शकतो. त्यासाठी मास तुम्ही कम्युनिकेशनचा कोर्स करू शकता. याशिवाय विधानसभा ते लोकसभेपर्यंत माध्यम सल्लागार म्हणूनही नोकरी मिळू शकते.

हे सुध्दा वाचा:- 10वी नंतर बीए इन पॉलिटिकल सायन्स करायचं आहे? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी

नागरी सेवा (Civil services)

आयएएस (IAS officer) आणि आयएफएस (IFS Officer) हे कला विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम करिअर पर्याय आहेत. पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करणाऱ्या व्यक्ती या क्षेत्रात सहज करिअर करू शकतात. आयएएस अधिकारी भारताचे नेतृत्व करतात आणि देशाच्या कल्याणासाठी काम करतात. नागरी सेवा परीक्षेत राजकीय प्रश्न येतात, जे राज्यशास्त्राचे विद्यार्थी सहज सोडवू शकतात.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button