कारचा AC बंद केल्याने कारचे मायलेज वाढते का? जाणून घेऊया हे खर आहे की खोटं |Car ac effect on mileage car care tips in marathi

मित्रांनो जर तुम्ही कारचे मालक असाल तर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की एसी आणि कारच्या मायलेजचा काय संबंध आहे. यामुळे अनेक लोक एसी चालू करत नाहीत. अनेकजण उन्हाळ्यात कारची खिडकी उघडी ठेवून गाडी चालवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की उन्हाळ्यात कार उघडी ठेवून गाडी चालवल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कारचा AC बंद केल्याने कारचे मायलेज वाढते का? जाणून घेऊया हे खर आहे की खोटं |car ac effect on mileage car care tips in marathi

एसी चालवल्याने इंजिनवर भार पडतो

कारचा एसी चालवल्याने इंजिनवर भार पडतो आणि इंधनही लागतं. हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. पण अशावेळी गाडीचा मायलेज नक्कीच कमी असतो. पण खिडक्या उघड्या ठेवून कार चालवण्याचे अनेक तोटे आहेत. या दोन्ही परिस्थितींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खिडक्या उघड्या ठेवून कार चालवावी का?

जर तुम्ही कार खिडकी उघडी ठेवून चालवली आणि तिचा वेग ताशी 30 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर मायलेज वाढण्याऐवजी कमी होऊ लागतो. यामागचे कारण असे की जेव्हा तुम्ही खिडक्या उघड्या ठेवता तेव्हा हवेचा दाब कारला मागे ढकलतो आणि इंजिनला कार पुढे नेण्यास भाग पाडतो. परिणामी इंधनाचा वापर जास्त होतो आणि मायलेज जास्त होते.

हे सुद्धा वाचा: सेकंड हँड कार घेताना काळजी नक्की घ्या, चुकूनही ‘या’ मोठ्या चुका करू नका

एसीचालू असताना गाडी चालवली तर काय होईल?

एसी चालवणाऱ्या कारमध्ये प्रवास केला तर गाडीचा मायलेज नक्कीच कमी होतो. पण गाडीची खिडकी उघडून जेवढा फरक पडेल तेवढा फरक पडणार नाही. यामध्ये तुम्हाला प्रति लिटर 2 ते 3 किलोमीटरचा फरक दिसेल. एका उदाहरणासह हे समजून घेऊया. कार एसीशिवाय 15 किमी प्रति लीटर मायलेज देते, नंतर एसी चालवल्यास हा फरक 12 ते 13 किमीवर येईल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button