भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? जाणून घ्या संपूर्ण माहिती | Who was the first woman governor of India?

मित्रांनो भारतीय इतिहासातील महिलांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते राजकारणाच्या लढाईपर्यंत महिलांनी दर वेळेस आपला सहभाग नोंदवला आहे. भारताच्या इतिहासात अनेक महिलांनी महत्त्वाच्या पदांवर जाऊन आपले नाव इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवले आहे. या पोस्टमध्ये आपण भारताच्या पहिल्या महिला राज्यपालांबद्दल ( first woman governor of India) जाणून घेणार आहे. ज्यांना देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महिला म्हणून राज्यपाल होण्याची संधी मिळाली.

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? जाणून घ्या संपूर्ण माहिती |Who was the first woman governor of India?

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू (Sarojini Naidu) होत्या. ज्यांना सरोजिनी चट्टोपाध्याय असेही म्हणतात. सरोजिनी यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. सरोजिनी नायडू यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे प्रसिद्ध विद्वान होते. तर त्यांची आई बंगाली भाषेत लिहिणाऱ्या कवयित्री होत्या.

इंग्लंडमधून पदवीचे शिक्षण घेतलं

सरोजिनी नायडू यांचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठवण्यात आले. येथे राहून त्यांनी किंग्ज कॉलेज आणि केंब्रिजच्या गिर्टन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. यासोबतच त्या कविताही लिहायच्या.

देशासाठी समर्पित करण्याचा निर्णय

सरोजिनी नायडू परदेशात असताना 1914 मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींना इंग्लंडमध्ये भेटल्या होत्या. महात्मा गांधींना भेटल्यानंतर त्या त्यांच्या विचारांनी अधिक प्रभावित झाल्या आणि त्यांनी स्वतःला देशासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर त्यांनी देशातील अनेक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्या अनेकवेळा तुरुंगातही गेली. नायडू यांनी भारताच्या विविध भागात जाऊन लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करत असे.

अनेक भाषांमध्ये भाषणे दिली

सरोजिनी नायडू जेव्हा भारताच्या वेगवेगळ्या भागात फिरून लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करत होत्या तेव्हा त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकांशी संवाद साधत होत्या. त्यांना हिंदी, इंग्रजी, बंगाली आणि गुजराती भाषा अवगत होत्या.

हे सुद्धा वाचा:भारतातील कोणत्या शहराला ‘कॉटन सिटी’ म्हणतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पहिल्या महिला राज्यपाल कशा झाल्या?

त्यांच्या लोकप्रियतेमुळे सरोजिनी नायडू यांची 1925 साली कानपूर येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्या भारताची प्रतिनिधी म्हणून दक्षिण आफ्रिकेतही गेली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वतीने त्यांना उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली. यादरम्यान त्यानी सांगितले होते की, मला स्वतःला जंगलातील मुक्त पक्ष्याप्रमाणे पिंजऱ्यात असल्याचे वाटत होते. पण ही जबाबदारी नेहरूंनी तिच्यावर टाकली त्यामुळे त्या टाळू शकल्या नाही. 2 मार्च 1949 रोजी त्यांचे निधन झाले.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button