Chandrayaan-3 Mission मध्ये या भारतीय कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे? जाणून घ्या कोणत्या आहेत त्या कंपन्या |Which companies are involved in Chandrayaan-3?

मित्रांनो चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी लँडिंगनंतर भारताने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 चे श्रीहरिकोटा येथून 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपण करण्यात आले, तर चंद्रयान-3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता चंद्रावर यशस्वीरित्या उतरले. भारतासोबतच संपूर्ण जगाचे लक्ष या मिशनवर होते.

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमध्ये इस्रो सोबतच अनेक भारतीय अंतराळ क्षेत्रातील कंपन्यांनी योगदान दिले आहे. या मिशनच्या यशामध्ये या कंपन्या मैलाचा दगड ठरला आहेत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या कंपन्यांनी थ्रस्टर्ससाठी रॉकेट इंजिनच्या निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. यामध्ये गोदरेज एरोस्पेस, टाटा स्टील, एल अँड टी, भेल आणि इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अंतराळ क्षेत्रात भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो. चला तर जाणून घेऊया या मिशनमध्ये कोण कोणत्या भारतीय कंपन्याने मोलाचे योगदान दिले आहे.

Chandrayaan-3 Mission मध्ये या भारतीय कंपन्यांचा मोलाचा वाटा आहे? |Which companies are involved in Chandrayaan-3?

लार्सन अँड टुब्रो कंपनी

अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी लार्सन अँड टुब्रो लिमिटेडने चांद्रयान-3 साठी अनेक आवश्यक घटकांचा पुरवठा केला होता. चांद्रयान-3 चा बूस्टर सेगमेंट हा याचं कंपनीने तयार केला आहे. यात हेड एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि नोजल बकेट फ्लॅंज असतात. चांद्रयान-3 च्या यशानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.

टाटा स्टील

देशातील सर्वात जुनी कंपनी टाटा ग्रुपनेही या मोहिमेत हातभार लावला आहे. टाटा स्टीलने उत्पादित केलेल्या क्रेनच्या मदतीने लॉन्च व्हेइकल LVM3 M4 (फॅट बॉय) असेंबल करण्यात योगदान दिले. टाटा स्टीलची ही क्रेन जमशेदपूरमधील टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आली आहे.

भेल

BHEL कंपनीने चांद्रयान-3 साठी इस्रोला बॅटरी पुरवल्या आहेत. कंपनीने चांद्रयान-3 साठी बाय-मेटलिक ॲडॉप्टर देखील प्रदान केले आहेत. मिशनच्या यशानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये सुध्दा तेजी आली आहे.

गोदरेज एरोस्पेस

गोदरेज एरोस्पेस या अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने चांद्रयान-3 मोहिमेसाठी विकास इंजिन, CE20 आणि सॅटेलाइट थ्रस्टर्स विकसित केले आहेत. याशिवाय कंपनीने L110 इंजिन देखील विकसित केले आहे.

अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेड

चांद्रयान-3 च्या यशात अनंत टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे योगदान आहे. कंपनीने इस्रोला अनेक उपकरणे पुरवली आहेत. कंपनीने या मोहिमेसाठी प्रक्षेपण वाहन, उपग्रह, अंतराळ यान पेलोड आणि ग्राउंड सिस्टम तयार केले आहेत.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) ला मिशनसाठी अनेक उपयुक्त वस्तूंचा पुरवठा केला आहे. मिशनच्या यशानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे.

हे सुद्धा वाचा:भारतातील कोणत्या शहराला ‘स्पेस सिटी’ म्हणून ओळखले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मिश्रा धातू निगम लिमिटेड

मिश्रा धातू निगम लिमिटेडने चांद्रयान-3 मोहिमेसाठी अनेक महत्त्वाचे साहित्य तयार केले आहे. यामध्ये कोबाल्ड बेस मिश्र धातु, निकेल बेस मिश्र धातु, टायटॅनियम मिश्र धातु आणि विशेष स्टील्स यांचा समावेश आहे. या सर्व सामग्रीचा वापर चांद्रयान-3 चे प्रक्षेपण वाहन तयार करण्यासाठी करण्यात आला आहे.

या कंपन्यांशिवाय पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स आणि एमटीएआर टेक्नॉलॉजीज यांनीही मोलाचे योगदान दिले आहे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button