एक्साईज इन्स्पेक्टर व्हायचं आहे? मग जाणून घ्या या पदाबद्दलची संपूर्ण माहिती |What is the process for becoming an excise officer in India?

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीची स्वप्ने ही वेगवेगळी असतात ज्यापैकी काहींना डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे असते, तर काहींना रेल्वे, बँकिंग इत्यादींमध्ये नोकरी करायची असते. त्याच वेळी असे काही लोक असतात ज्यांना देशाची सेवा करायची असते. त्यापैकीच एक पद म्हणजे एक्साईज इन्स्पेक्टर ( Excise inspector) ज्याला आपण मराठी मध्ये उत्पादक शुल्क निरीक्षक असे म्हणतो. मित्रांनो हे पद केंद्र सरकारच्या अखत्यारीत मध्ये येते. आणि हे एक अतिशय शक्तिशाली पद आहे. जर तुम्हाला पण एक्साईज इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा द्यावे लागता. त्यासाठी पात्रता काय आहे, हे सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

एक्साईज इन्स्पेक्टर व्हायचं आहे? मग जाणून घ्या या पदाबद्दलची संपूर्ण माहिती |What is the process for becoming an excise officer in India?

एसएससी सीजीएल परीक्षा (SSC CGL Exam)

एक्साईज इन्स्पेक्टर होण्यासाठी तुम्हाला संयुक्त पदवी स्तर (एसएससी सीजीएल) परीक्षेत द्यावी लागेल. CGL परीक्षा ही दरवर्षी आयोजित केली जाते आणि ती आयोजित करण्याची जबाबदारी ही स्टाफ सिलेक्शन कमिशनला म्हणजेच SSC वर असते.

ही परीक्षा दोन स्तरांत होते

एसएससी सीजीएल परीक्षा ही दोन टप्प्यांत घेतली जाते. टियर-1 आणि टियर-2. टियर 1 परीक्षांमध्ये 100 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातात. टियर 1 मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या विषयांमधून प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जातो. सर्व उमेदवारांसाठी पेपर 1 हा अनिवार्य आहे. टियर-1 परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर-2 परीक्षेसाठी पात्र ठरतील.

या परीक्षेसाठी पात्रता काय आहे?

या परीक्षेत सहभागी होण्यासाठी, उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाते.

हे सुध्दा वाचा:- गुगलमध्ये इंटर्नशिप करा आणि मिळवा लाखोंची नोकरी, जाणून घेऊया संपुर्ण माहिती

पगार किती मिळतो?

उत्पादन शुल्क निरीक्षक पदांवर नियुक्त केलेल्या उमेदवारांना केंद्र सरकारकडून वेतन स्तर-7 नुसार दर महिन्याला रु. 44900 ते रु. 142400 रुपयांचे वेतन दिले जाते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button