‘हे’ आहे देशातील टॉप MBA college, जिथून मिळेल 1 कोटी रुपयांचे पॅकेज, जाणून घ्या कसे मिळवायचे प्रवेश |What is the highest package offered in IIM Calcutta placements 2023?

मित्रांनो देशातील टॉप मॅनेजमेंट कॉलेजांची यादी तयार केली तर ती आयआयएम कलकत्ता (IIM Calcutta) शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. NIRF रँकिंग 2023 मध्ये, ते देशातील टॉप व्यवस्थापन महाविद्यालयांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आयआयएम कलकत्ताच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फॅकल्टी मेंबर्सचे 100 हून अधिक पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यात जगातील प्रतिष्ठित फॅकल्टी स्टाफ, कॅम्पस प्लेसमेंट रेकॉर्ड आणि सुंदर कॅम्पस यामुळे एमबीए इच्छूकांसाठी विशेष पसंती आहे. आज आपण IIM कलकत्ता च्या कटऑफ 2023, एमबीए फी आणि सर्वोच्च प्लेसमेंट पॅकेजबद्दल जाणून घेणार आहोत.

हे आहे देशातील टॉप MBA college, जिथून मिळेल 1 कोटी रुपयांचे पॅकेज, जाणून घ्या कसे मिळवायचे प्रवेश |What is the highest package offered in IIM Calcutta placements 2023?

आयआयएम कलकत्त्याचा कट ऑफ

IIM कलकत्ता च्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये बसण्यासाठी, सामान्य उमेदवारांसाठी पर्सेंटाइल 85, OBC-NC/IWS 75, SC 70, ST 65, अपंगांसाठी 55 पर्सेंटाइल आहे. पण अंतिम प्रवेशाचा कटऑफ वेगळा आहे. माहितीनुसार, 2021 आणि 2022 मध्ये IIM कलकत्ताच्या एमबीए प्रोग्राममध्ये 99 टक्के प्रवेश झाला होता.

हे सुध्दा वाचा:- फार्मसीसाठी महाराष्ट्रातील टॉप कॉलेज कोणते आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयआयएम कलकत्ताची फी किती आहे?

आयआयएम कलकत्ताची फी ही, 31 लाख रुपये आहे. जे चार हप्त्यांमध्ये देता येईल. ज्यामध्ये स्वीकृती प्रवेशाच्या वेळी 20 लाख रुपये जमा करावे लागतील. यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता 10 लाख रुपये असेल. शेवटचा आणि चौथा हप्ता 9 लाख रुपये असेल. या शुल्कामध्ये शिक्षण शुल्क, अभ्यासक्रम साहित्य, पुस्तके, निवासासाठी वसतिगृह शुल्क, इकॉनॉमी क्लासमधील प्रवास खर्च आणि महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा खर्च समाविष्ट केला जाईल. परंतु वीज, अन्न आणि वैयक्तिक खर्चाचा समावेश केला यात नाहीये.

IIM कलकत्ता चे सर्वोच्च प्लेसमेंट पॅकेज किती आहे?

IIM कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये सर्वाधिक 94.82 लाख रुपयांचे आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट पॅकेज मिळाले आहे. तर सर्वाधिक देशांतर्गत पॅकेज 1.15 कोटी रुपये होते.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button