मार्केटमध्ये नवीन स्कॅम आलाय, ज्यूस जॅकिंग नावाचा, जसा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावला लगेच बँक खाते हॅक |What Is juice jacking scam How Scammers Are Stealing Banking Data in marathi

मित्रांनो तुमच्यासोबतही असे कधी घडले आहे का? जेव्हा तुम्हाला घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंगची गरज भासली असेल. जर उत्तर होय असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी अलर्ट म्हणून लिहिली जात आहे. आजकाल घोटाळे करणारे ज्यूस जॅकिंग स्कॅमच्या माध्यमातून फसवणुकीचा सापळा पसरवत आहेत. खरेतर वित्त क्षेत्रातील वित्तसंबंधित फसवणुकीवरील आरबीआयच्या नोटबुकनुसार ज्यूस जॅकिंग (Juice Jacking) वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे.

मार्केटमध्ये नवीन स्कॅम आलाय, ज्यूस जॅकिंग नावाचा|What Is juice jacking scam How Scammers Are Stealing Banking Data in marathi

काय आहे ज्यूस जॅकिंग स्कॅम?

मित्रांनो वास्तविक ज्यूस जॅकिंग घोटाळा ही फसवणूक करण्याची एक हायजॅकिंग पद्धत आहे. या प्रकारच्या घोटाळ्यात सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मालवेअरसह सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टॉल केले जात आहे. युजर्सने फोन चार्जिंगसाठी पोर्टशी कनेक्ट करताच काही सेकंदात तुमचे सर्व पैसे चोरीला जातात.

ज्यूस जॅकिंगचा घोटाळा कसा चालतो?

  • प्रथम सापळा रचला जातो: घोटाळेबाजांनी प्रथम सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मालवेअरवाल सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर सेट करतात. लोकांना अनेकदा विमानतळ, रेल्वे स्थानके, हॉटेल किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी फोन चार्जिंगची आवश्यकता भासते. आणि अशाच संधीचा फायदा घेऊन हे स्कॅमर घेतात.
  • युजर्सला आमिष दाखवणे: यानंतर स्कॅमर्सना युजरला आमिष दाखवायचे असते. यासाठी तो चार्जिंग स्टेशनला “फ्री चार्जिंग” असा बोर्ड लावतो. मोफतचे लेबल पाहून अधिकाधिक युजर्स या मोहात पडतात.
  • डेटा चोरी: अखेरीस स्कॅमर त्यांची योजना अंमलात आणतात. युजर्स USB केबलद्वारे डिव्हाइसला चार्जिंग स्टेशनशी कनेक्ट करताच, इंस्टॉल मालवेअर युजर्सचा डेटा चोरतो. स्कॅमर कनेक्ट केलेल्या उपकरणांमधून पासवर्ड, फोटो आणि बँकिंग माहिती यासारखा खाजगी डेटा चोरतो.

हे सुध्दा वाचा:- भारताच Maps ॲप बनल आहे, भारताच पहिलं मोफत ॲप, जाणून घ्या कोणत आहे ते ॲप

ज्यूस जॅकिंग स्कॅमपासून कसं वाचायचं?

Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप
  • युजर्सना सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंगला न लावण्याचा आम्ही देऊ.
  • घराबाहेर पडताना गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मोफत चार्जिंग स्टेशनला भेट देणे टाळावे.
  • मोबाईल मधील बॅटरी लवकर संपली तर त्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची पॉवरबँक जवळ ठेवू शकता.
  • सार्वजनिक वायफायचा वापर न केलेला बरा.
  • तुमच्या डिव्हाइसला नेहमी अपडेट ठेवा.
  • फोन हा कधी पण फक्त नवीन ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत असल्याचा प्रयत्न करा. ( जर मोबाईलचे नवीन अपडेट आले असेल तर ते लगेच अपडेट करून घ्यावे)
  • तुमच्या फोनमध्ये मालवेअर डिटेक्शन ॲप इंस्टॉल करा.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button