तुम्हाला पण Education Loan घ्यायचं आहे? मग जाणून घ्या संपूर्ण माहिती |What are the requirements for education loan?

मित्रांनो अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्या आवडीचे क्षेत्र निवडाच्या वेळेस पैशाचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे करिअरसमोर आर्थिक समस्या निर्माण होतात. संबंधित कॉलेजमध्ये शुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसतात. अशा परिस्थितीत कधीकधी आपल्याला आपल्या स्वप्नांचा बळी द्यावा लागतो.

पण, अशा वेळी साथ मिळते ती, शैक्षणिक कर्जाची (Education Loan) ची. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन यासह इतर अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून मिळालेल्या या कर्जामुळे फी भरण्याच्या समस्येपासून बऱ्याचदा दिलासा मिळतो. परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्नही या मदतीने पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही पण या दिशेने विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात सांगणार आहोत. म्हणजेच, जर तुम्हाला पण एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील. जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा.

तुम्हाला पण Education Loan घ्यायचं आहे? मग जाणून घ्या संपूर्ण माहिती |What are the requirements for education loan?

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

बँक कर्जासाठी, उमेदवारांनी 10वी, 12वीची मार्कशीट, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, ओळखीचा पुरावा (पासपोर्ट/ड्रायव्हिंग/मतदार आयडी), प्रवेश परीक्षेचा निकाल, ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा पास झाली आहे त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी आणि पालक दोघांच्या आधार कार्डसह इतर कागदपत्रे आवश्यक आहेत. यासोबतच अर्जदाराकडे पूर्वीचे कर्ज आहे का, हेही तपासले जाते.

हे सुध्दा वाचा:- 12 वीनंतर शिक्षक होण्यासाठी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोणत्या पात्रता आवश्यक आहेत?

  • या कर्जासाठी अर्ज करणारे उमेदवार देशाचे नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा. तसेच, उमेदवार ज्या कोर्ससाठी अर्ज करू इच्छितो त्याची रोजगारक्षमता टक्केवारी किती आहे. या बाबी आणि इतर अनेक गोष्टींचा विचार केल्यानंतर विद्यार्थी या कर्जासाठी पात्र ठरतात.
  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे आहेत. या अंतर्गत काही हुशार विद्यार्थी हे कर्ज स्वतः घेतात. त्याचबरोबर काही वेळा पालकही मुलांच्या शिक्षणाच्या नावाखाली बँकेकडून कर्ज घेतात.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button