तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत का? मग त्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहे का? |What are the pros and cons of multiple credit cards?

मित्रांनो गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य लोक क्रेडिट कार्डचा (credit cards) वापर करत आहेत. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. क्रेडिट कार्ड कंपनी अनेक अटींसह क्रेडिट कार्ड सुविधा देते. अनेक लोकांकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे क्रेडिट कार्ड आहेत.

अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीकडे किती क्रेडिट कार्ड असावे असा प्रश्न मनात येतो. तसे क्रेडिट कार्ड असण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. एखादी व्यक्ती कितीही क्रेडिट कार्ड धारण करू शकते. कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्ड मिळेल की नाही हे त्या कंपनीवर अवलंबून असते. चला तर जाणून घेऊया एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत?

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत का? मग त्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहे का? |What are the pros and cons of multiple credit cards?

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचे फायदे

  • जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर त्यामुळे तुमची खर्च करण्याची क्षमता वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची आर्थिक व्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी याचा वापर करू शकता.
  • याशिवाय तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास तुम्ही एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डद्वारे भरू शकता. याला बॅलन्स ट्रान्सफर म्हणतात.
  • एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्‍याने तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी होतो. ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला कर्ज मिळविण्यात खूप मदत करतो.

हे सुध्दा वाचा:- निवृत्तीच्या वेळी जवळ पाहिजे असेल पैसा, तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे तोटे काय आहेत?

  • जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतात तेव्हा ते व्यवस्थापित करण्यात आपल्याला खूप त्रास होतो. क्रेडिट मर्यादा ओलांडल्यानंतर आपण जास्त खर्च करू लागतो.
  • ज्यामुळे आपल्याला बिल पेमेंट करताना समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
  • तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल उशीरा भरल्यास ते तुमच्या क्रेडिट स्कोअरला मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. म्हणून क्रेडिट कार्ड नेहमी काळजीपूर्वक वापरा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button