म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय, मग चुकूनही करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या संपूर्ण माहिती |What are the common mistakes investing in mutual fund?

मित्रांनो आज एखादी व्यक्ती आपली बचत वाढवण्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करते. यापैकी एक योजना म्हणजे म्युच्युअल फंड (mutual fund). गुंतवणुकीसाठी हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूक करणे किती धोक्याच आहे यासोबतच यामध्ये किती रिटर्न मिळते आणि गुंतवणूक करताना कोणत्या चुका आपल्याला महागात पडू शकतात हे आज आपण जाऊन घेणार आहोत. तुम्हीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी तुम्ही कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय मग चुकूनही करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या संपूर्ण माहिती |What are the common mistakes investing in mutual fund?

अल्पकालीन गुंतवणूक

आपण कधीही म्युच्युअल फंडात अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करू नये. जर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर सुमारे 7 वर्षे गुंतवणूक करा. म्युच्युअल फंडात तुम्हाला दीर्घकालीन नफा मिळतो. तुम्हाला अल्पावधीत नुकसान सहन करावे लागू शकते. याशिवाय गुंतवणुकीपूर्वी ध्येय निश्चित करावे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, म्युच्युअल फंड शेअर बाजाराच्या कामगिरीच्या आधारावर काम करतात. अशा परिस्थितीत बाजारातील चढउतारांचा परिणाम तुमच्या फंडांवरही दिसू शकतो.

गुंतवणूक रक्कम

गुंतवणूक करताना एकीकडे ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे, तर दुसरीकडे गुंतवणुकीची रक्कमही लक्षात ठेवावी. आपण असे न केल्यास, आपल्याला परतावा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. हे अशा प्रकारे समजून घ्या, जर तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवली तर तुम्हाला जोखीम लक्षात ठेवावी लागेल.

उदाहरणार्थ, जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये 20 वर्षे आणि 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर त्यासाठी तुम्हाला दरमहा 1,000 रुपये किंवा एकाच वेळी 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल का याचा विचार करावा लागेल. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसह आवश्यक रकमेचे मूल्यमापन करावे लागेल.

SIP बंद करणे

अनेक वेळा गुंतवणूकदार एसआयपी योजना बंद करतात. हे अजिबात करू नये. याशिवाय, तुम्ही फंडातून वारंवार पैसे काढू नयेत. SIP वर तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळते. जर तुम्ही वारंवार पैसे काढत असाल तर त्याचा तुमच्या व्याजदरावरही परिणाम होतो.

हे सुध्दा वाचा:- सणासुदीच्या काळात खर्चाचे आर्थिक नियोजन कसे करावे? जाणून घ्या पैसे कसे वाचवता येतील

बाजारातील घसरणीमुळे पैसे काढणे

अनेक वेळा गुंतवणूकदार शेअर बाजारातील घसरणीच्या भीतीने फंडातून पैसे काढतात. गुंतवणूकदारांनी अशी प्रतिक्रिया देऊ नये. शेअर बाजारातील घसरणीवर गुंतवणूकदारांनी प्रतिक्रिया देऊ नये. असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय, त्यांनी नेहमीच म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करावी.

फक्त टॉप फंडातच गुंतवणूक करा

बाजारातील टॉप फंडांकडे पाहता, गुंतवणूकदार फक्त त्यात गुंतवणूक करतात. तर अस करू नये. कारण कधी-कधी वर असलेल्या फंडाची कामगिरीही घसरते. त्याच वेळी, जो फंड गुंतवणुकीच्या वेळी चांगली कामगिरी करत नाही तो 3-4 वर्षांनी चांगली कामगिरी करू शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक विचार करूनच कोणत्याही फंडात गुंतवणूक करावी.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button