मित्रांनो महिला वर्गाला लक्षात घेऊन बँक ऑफ इंडियाने खास नारी शक्ती बचत खाते (Nari Shakri Savings Account) सुरू केले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या आणि 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांवर लक्ष केंद्रित करून बँकेने हे खाते सुरू केले आहे. बँक ऑफ इंडियाच्या (bank of india) नारी शक्ती या विशेष बचत खात्यात खाते उघडणाऱ्या महिलांना अनेक फायदे मिळतात. आज आपण याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
बँक ऑफ इंडियाच्या नारी शक्ती बचत खात्याबद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल तर नक्की जाणून घ्या |What are the benefits of Nari Shakti Savings Account
नारी शक्ती बचत खात्याचे फायदे काय आहेत? |Benefits of Nari Shakti Savings Account
- 1 कोटी रुपयांपर्यंतचा अपघाती विमा
- महिलांवर आधारित आरोग्य आणि निरोगीपणा योजनेवर सवलत
- लॉकर भाड्यावर सूट
- प्रक्रिया शुल्काशिवाय किरकोळ कर्ज
- मोफत डेबिट आणि क्रेडिट कार्ड
- डीमॅट खात्यासाठी AMC शुल्कावर सूट
- POS वर व्यवहारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मर्यादा
हे सुध्दा वाचा:- शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड व्यतिरिक्त तुम्ही अनेक प्रकारे गुंतवणूक करू शकता, जाणून घ्या किती पर्याय आहेत
नारी शकरी बचत खाते कसे उघडावे?
- बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील 5132 शाखांमध्ये कोणतीही महिला नारी शक्ती बचत खाते उघडू शकते. यासोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे नारी शक्ती खातेही उघडता येणार आहे.
- बँक ऑफ इंडियाच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावरील व्याजदर 2.75 टक्के आहे. त्याच वेळी, बँक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत खात्यातील शिल्लक रकमेवर 2.90 टक्के व्याज देत आहे.
- नारी शक्ती बचत खाते सुरू करताना, बँक ऑफ इंडियाने एक निवेदन जारी केले की या योजनेअंतर्गत उघडलेल्या प्रत्येक खात्यावर, बँक तिच्या CSR निधीमध्ये 10 रुपये योगदान देईल. हा निधी गरजू महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी वापरला जाणार आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.