‘हे’ आहेत क्रेडिट कार्डचे Hidden charges, कार्ड घेण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा |What are some hidden fees on credit card?

मित्रांनो बँका तुम्हाला कोणताही तारण न घेता क्रेडिट कार्ड देतात. क्रेडिट कार्डवर उपलब्ध कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि ऑफर्समुळे आपण क्रेडिट कार्ड घेतो. पण नंतर त्याच्याशी संबंधित छुपे शुल्क (Hidden charges) पाहून घाबरून जातो.

जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला आणि वेळेवर बिल भरले तर काही काळजी करण्याचं कारण नाही. पण तुम्हाला काही Hidden charges ची जाणीव असणे आवश्यक आहे जे तुमच्याकडून आकारले जातात. चला तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.

हे आहेत क्रेडिट कार्डचे Hidden charges, कार्ड घेण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा |What are some hidden fees on credit card?

वार्षिक देखभाल शुल्क (Annual maintenance charge)

जेव्हा तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा हे शुल्क प्रत्येक क्रेडिट कार्डवर लागू होते. काही बँका पहिल्या वर्षासाठी जॉइनिंग फी आणि मेंटेनन्स चार्ज माफ करतात. पण पुढच्या वर्षापासून तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डचा मेंटेनन्स चार्ज दरवर्षी भरावा लागेल.

रोख आगाऊ फी (Cash advance fees)

कॅश ॲडव्हान्स फी म्हणजे? तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून एटीएममधून काढलेली रक्कम. साधारणपणे एटीएममधून क्रेडिट कार्डमधून पैसे काढणे योग्य नाही, कारण बँक त्यावर जास्त शुल्क आकारतात. सामान्यतः, रोख आगाऊ शुल्क रोख आगाऊ रकमेच्या 2.5 टक्के असते.

हे सुध्दा वाचा:- आरोग्य विम्यात ॲड होणाऱ्या नवीन फीचरबद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

व्याज दर (APR)

जेव्हा तुमचे क्रेडिट कार्ड बिल तयार होते. तेव्हा त्यात एकूण देय रक्कम आणि किमान देय रक्कम लिहिली जाते. बरेच लोक फक्त किमान रक्कम भरतात. पण असे केल्याने तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता कारण क्रेडिट कार्ड कंपनी उर्वरित रकमेवर दरमहा 2 ते 4 टक्के व्याज आकारते.

उशीरा पेमेंट शुल्क (Late payment charge)

जर तुम्ही देय तारखेपूर्वी किमान रक्कम भरली नाही, तर क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्यावर विलंब शुल्क आकारते.

परदेशी व्यवहार शुल्क (Foreign transaction fees)

तुम्ही परकीय चलनात केलेल्या कोणत्याही व्यवहारासाठी, परकीय व्यवहार शुल्क लागू होते. हे शुल्क तुम्ही परदेशात केलेल्या खरेदीच्या मूल्याच्या 3 टक्क्यांपर्यंत आहे.

जीएसटी (GST)

क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहारावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button