महाराष्ट्र राज्यातील शिर्डीचे साईबाबा मंदिराविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Shirdi sai baba temple information in marathi

भारतातील महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे की या राज्यात बऱ्याच चमत्कारिक घटना घडत राहतात. महाराष्ट्र या राज्याच्या इतिहासावर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र राज्याचा इतिहास किती मोठा आहे. याच कारणाने महाराष्ट्र राज्याला महत्त्वपूर्ण राज्य मानले जाते.

महाराष्ट्र राज्यातील शिर्डीचे साईबाबा मंदिराविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Shirdi sai baba temple information in marathi

महाराष्ट्र राज्याचा इतिहास भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. कारण या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. तसेच या राज्याच्या अध्यात्मिक बाबीबाबत सांगायचे झाल्यास या राज्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारखे महान संत आध्यात्मिक माध्यमातून समाज प्रबोधन करून गेले.

महाराष्ट्र राज्याच्या या पवित्र भूमीवर देवाने प्रत्येक कालखंडात वेगवेगळे अवतार घेतले आहेत. त्यामुळे पर्यायाने महाराष्ट्र राज्यात बहुसंख्य प्राचीन देवी देवतांचे मंदिर आहेत. यामध्ये प्रामुख्याने भगवान विठ्ठल मंदिर, गजानन महाराज मंदिर, माता तुळजाभवानी मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, श्री साईबाबा मंदिर (sai baba temple) हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे धार्मिक मंदिर आहेत या सर्व धार्मिक स्थळांना एक विशिष्ट असा महत्त्वपूर्ण इतिहास आहे. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील सर्वात महत्त्वाचे शिर्डीचे साईबाबा मंदिराविषयीचा इतिहास काय आहे?

शिर्डीचे साईबाबा मंदिर |Shirdi sai baba temple information

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साईबाबांचे मंदिर आहेत पण शिर्डीला जे साईबाबा चे मंदिर आहे ते पूर्णपणे इतर ठिकाणांच्या मंदिरापेक्षा वेगळे आहे. याला कारण हे आहे की शिर्डीचे साईबाबा हे मंदिर निर्माण होण्याअगोदर या छोट्याशा गावात वास्तव्यास होते.

शिर्डी मध्ये साईबाबा इतर सामान्य माणसांसारखे जीवन व्यतीत करत होते. पण साहेबांचा पेहराव हा इतर माणसापेक्षा वेगळा होता त्यामुळे साईबाबांना सर्व फकीर म्हणून संबोधत असे.

साईबाबा हे एक महान अध्यात्मिक गुरु होते व त्यांच्यापाशी खूप अद्वितीय अशा अद्भुत शक्ती होत्या पण साईबाबांनी कधीही अद्भुत शक्तीचे प्रदर्शन केले नाही. पण लोकांच्या मनात साईबाबा विषयी प्रचंड आस्था होती व या आस्थेतून लोक साई बाबांना देवाचा अवतार मानू लागले. साईबाबांच्या सत्कर्मातून जे कार्य घडले ते कार्य साधारण व्यक्ती कधीही करू शकत नाहीत. साईबाबांचे प्रसिद्ध व पवित्र मंदिर महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) या गावात आहे. विशेष म्हणजे साईबाबांचे शिर्डी स्थित मंदिर महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई पासून अवघे 300 किलोमीटर दूर आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु होते.

हिंदू मुस्लिम समुदायाप्रमाणेच इतर समुदायाचे लोक देखील साईबाबांचे भक्त आहेत. साईबाबा शिर्डी या छोट्याशा गावात राहत होते व त्यावेळेस शिर्डी हे गाव बऱ्याच लोकांना प्रचलित देखील नव्हते. साईबाबांचा पेहराव हा मुस्लिम फकीरासारखा होता पण साईबाबांना हिंदू धर्मातील सर्व धर्मग्रंथांचे परिपूर्ण ज्ञान होते.

साईबाबा सर्व धर्म व जातीतील लोकांना एक समान मानत होते. त्यांनी कधीही या लोकांचा भेदभाव केला नाही. साई बाबांनी लोक कल्याणासाठी खूप चमत्कार केले. विशेष म्हणजे त्या चमत्काराची गणना देखील आपण करू शकत नाही.

साईबाबांना समाधी घेऊन 100 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत पण साईबाबांना समाधी घेणे अगोदर पासून काही लोक त्यांना आपले गुरु मानत. त्यामुळेच दिवसागणित शिर्डीचे साईबाबांची प्रसिद्धी वाढत चालली आहे. ज्या लोकांना आध्यात्मिक आवड आहे त्यांच्यासाठी साईबाबा सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहे. साईबाबांनी ज्या कालखंडात हिंदू व मुस्लिम समाज एक राखण्यासाठी जे काम केले त्यांची तुलना आज आपण कोणाशीही करू शकत नाही कारण त्या कालखंडात हिंदू-मुस्लिम समाज ऐकी असणे गरजेचे होते. कारण तो कालखंड इंग्रज गुलामगिरीचा होता.

आजच्या घडीला सर्व धर्माची लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. साईबाबांच्या शिर्डीला गुरुवारचे खूप महत्त्व आहे. या दिवशी साईबाबांच्या शिर्डीला खूप साऱ्या प्रमाणात भक्तगण बाबांच्या दर्शनाला हजेरी लावतात.

महाराष्ट्रातील लोकांसाठी शिर्डीचे साई मंदिर श्रद्धेचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्र राज्यात शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराला एक विशेष मानाचे स्थान आहे. साई बाबांचे शिर्डी स्थित मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. साई बाबाची दर्शन घेण्यासाठी जगभरातून भक्तगण शिर्डीला आवर्जून भेट देतात.

शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचा इतिहास काय आहे? |Shirdi sai baba temple history in Marathi

असे सांगण्यात येते की जेव्हा साईबाबा 16 वर्षांचे होते तेव्हा शिर्डीस वास्तव्यास आले. सण 1918 मध्ये साईबाबांनी शिर्डीमध्ये समाधी घेतली. परंतु 100 वर्षानंतर देखील साईबाबांचे खरे नाव बाबांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता या याबाबतीतील माहित कोणालाही माहिती नाही.

दररोज नित्यनियमाने शिर्डी स्थित साईबाबांच्या मंदिरात बाबांची आरती होते. त्यानंतर पूजा व नंतर अभिषेक केला जातो. याव्यतिरिक्त शिर्डी स्थित साई मंदिरात संपूर्ण वर्षभरात असंख्य कार्यक्रम भक्तगणाकडून राबविले जातात. शिर्डीस्थित साई मंदिरातील बाबांची जी मूर्ती आहे ती अतिशय मनमोहक व सुंदर आहे. साईबाबांची मूर्ती बघितल्यानंतर भक्तगणाच्या मनाला शांती व आनंद लाभतो.

कधी-कधी शिर्डी स्थित साई मंदिरात भक्तगणाची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात येते की साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांना रांगेत तब्बल 10 ते 12 तास थांबावे लागते.

हे सुध्दा वाचा- श्री वरदविनायक गणपती मंदिराविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

शिर्डी साईबाबा मंदिराची विशेषता तुम्हाला माहित आहे का?

शिर्डीचे साईबाबांचे मंदिर प्रसिद्ध होण्यास कारण हे आहे की शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यास आलेल्या बाबांच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रत्येक वर्षी भक्तगण साईबाबांकडे काही ना काही मागत असतात. व त्या इच्छा पूर्ण झाल्यास भक्तगण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराला मोठ्या उत्साहाने भेट देतात.

जे लोक आजारी आहेत त्यांना साईबाबांची धुन ऐकवली जाते. यास कारण की साईबाबांची धुन खूप चमत्कारिक आहे. ही धुन ऐकल्यास साहेब भक्तांचे सर्व आजार दूर पळून जातात. समाधी घेण्या अगोदर साईबाबांनी आपल्या सर्व भक्तांना वचन दिले होते की समाधी घेतल्यानंतर ते समाधी स्थित जागेवर राहतील व आपल्या भक्तावर आपली कृपादृष्टी कायम ठेवतील.

जे कोणी भक्तगण आपल्या आयुष्यात दुखी किंवा नैराश्यात आहे तो आपले दुःख व नैराश्य दूर करण्यासाठी साईबाबांच्या शिर्डीला येतो व त्या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्या भक्ताच्या जीवनात पुन्हा सुख- समृद्धी येते. शिर्डी स्थित साईबाबाचे मंदिर खूप अद्भुत आहे या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या मनाला शांती व आनंद लाभतो.

शिर्डी स्थित साई मंदिरापर्यंत कसे जाणार?

साईबाबांच्या शिर्डीला जाण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. भक्तगण बस किंवा टॅक्सीने देखील शिर्डीला येऊ शकतो.

  • रेल्वे स्टेशन

साई बाबांच्या शिर्डीला येण्यासाठी रेल्वेची सुविधा देखील उपलब्ध आहे. शिर्डीला देखील एक रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे भक्तगण मनमाड किंवा नाशिक रोड स्टेशन पासून शिर्डीला सुखरूप येऊ शकतो.

  • हवाई मार्ग (विमानसेवा)

महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथील हवाई मार्ग शिर्डी पासून केवळ 100 किलोमीटर दूर आहे. तसेच छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) हवाई मार्ग शिर्डी पासून केवळ 125 किलोमीटर दूर आहे.

  • शिर्डी स्थित साई मंदिर उघडे राहण्याची वेळ

शिर्डी स्थित साई मंदिर दररोज सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत साई भक्तांसाठी उघडे असते. या वेळेच्या कालावधीत साहेब फक्त साईबाबांचे दर्शन घेऊ शकतात.

शिर्डीच्या साईबाबांना सर्व धर्म समुदायातील लोक मानतात तसेच हिंदू-मुस्लिम समुदायातील भक्तगण देखील शिर्डी स्थित मंदिराला मोठ्या उत्साहाने भेट देतात.

Note: जर तुमच्याकडे Shirdi sai baba temple information in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Shirdi sai baba temple information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button