अभिनेता राजपाल यादव यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | Rajpal yadav amazing facts in Marathi

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव (Rajpal yadav) यांचा आज 52वा वाढदिवस आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे जन्मलेल्या राजपाल यादव यांनी आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर इंडस्ट्रीत आपले खास स्थान निर्माण केले. कॉमेडियनने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आणि दूरदर्शनच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ मधून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर त्यांना अनेक टीव्ही मालिकांच्या ऑफर्स मिळू लागल्या आणि त्यात त्यांनी कामही केले.

अभिनेता राजपाल यादव यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Rajpal yadav amazing facts in Marathi

 • राजपाल यादव यांचा जन्म 16 मार्च 1971 रोजी शाहजहांपूर, यूपी येथे झाला.
 • राजपाल यांनी लखनौच्या भारतेंदू नाट्य अकादमी ( Bharatendu Natya Academy) आणि नॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले.
 • 1997 मध्ये राजपाल यादव हे मुंबईला रवाना झाले आणि टेलिव्हिजनमध्ये करिअरची सुरुवात झाली.
 • राजपाल हे पहिल्यांदा दूरदर्शनच्या ‘मुंगेरी लाल के भाई नौरंगी लाल’ या कार्यक्रमात दिसले.
 • राजपाल यादव यांनी 1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
 • त्यानंतर ‘जंगल’, ‘कंपनी’, ‘हम किसी से कम नहीं’, ‘हंगामा’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘मैं मेरी पत्नी और वो’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘फिर हेरा फेरी’ यासोबतच ‘चुप चुपके’ आणि ‘भूल भुलैया’ असे अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
 • न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी राजपाल यांना 2013 मध्ये 10 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.
 • राजपाल यादव यांनी 2010 मध्ये ‘अता पता लापता (Ata pata laapata) चित्रपटासाठी दिल्लीतील एका व्यावसायिकाकडून 5 कोटींचे कर्ज घेतले होते आणि ते परत केले नाही, त्यामुळे त्यांना 3 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता.
 • राजपाल यादव यांची दोन लग्न झाली आहेत. पहिली पत्नी करुणा हिला एक मुलगी ज्योती आहे.
 • ज्योतीच्या जन्माच्या वेळी त्याची आई करुणा यांचे निधन झाले होते. आणि दुसरी पत्नी राधा त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे.
 • राधा यांना एक मुलगी हनी असून गेल्या वर्षी तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button