मित्रांनो मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी जर तुम्ही अशी योजना शोधत असाल ज्यामध्ये तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता आणि FD पेक्षा जास्त व्याज मिळवू शकता. तर तुमच्यासाठी PPF हा एक चांगला पर्याय असू शकतो.
PPF खाते तुमच्या मुलाला बनवू शकते करोडपती, जाणून घ्या PPF खाते उघडण्याचे काय नियम आहेत? |Ppf account for minor information in marathi
मुलांच्या नावाने PPF खाते उघडता येते का?
सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांच्या नावाने पी पी एफ खाते उघडता येते का? तर याचे उत्तर आहे हो. प्रौढांप्रमाणेच मुलांच्या नावानेही पीपीएफ खाते उघडता येते. पण ते फक्त मुलांच्या पालकांच्या वतीने उघडले जाऊ शकते आणि त्याला मायनर पीपीएफ खाते (अल्पवयीनांसाठी पीपीएफ खाते) असे म्हणतात.
अल्पवयीन मुलाच्या नावाने पालक फक्त एकच पीपीएफ खाते उघडू शकतात. जर एखाद्याला दोन मुले असतील तर एका मुलाचे मायनर पीपीएफ खाते आईच्या नावाने उघडले जाऊ शकते आणि दुसऱ्याचे अल्पवयीन पीपीएफ खाते वडिलांच्या नावाने उघडले जाऊ शकते. दोन्ही पालक मुलाच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत.
पीपीएफ खात्याची वैशिष्ट्ये काय आहेत?
- सुरक्षित गुंतवणुकीसाठी पीपीएफ खाते हा लोकप्रिय पर्याय आहे.
- यामध्ये तुम्ही वर्षाला 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता.
- सध्या 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.
- पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. त्यानंतर ती आणखी पाच वर्षांसाठी वाढवता येईल.
- आयकराच्या कलम 80C अंतर्गत, PPF मधील गुंतवणुकीवर 1.50 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.
हे सुध्दा वाचा:- पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खात्यात जमा केलेले पैसे कोणाला मिळू शकतात?
मुले त्याचे पीपीएफ खाते हाताळू शकते का?
18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मूल त्याचे पीपीएफ खाते हाताळू शकते. यासाठी अल्पवयीन खात्यातून मेजर खात्याकडे अर्ज द्यावा लागेल. पण आजारपण किंवा उपचारासारख्या विशिष्ट परिस्थितींमुळे अल्पवयीन पीपीएफ खाते पाच वर्षानंतरच बंद केले जाऊ शकते.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.