म्युच्युअल फंड म्हणजे काय? थोडक्यात जाणून घेऊया ? | Mutual fund information in Marathi

मित्रांनो तुम्ही आजच्या दैनंदिन जीवनात वावरतांना म्युच्युअल फंड (Mutual fund) बद्दल ऐकलं असेल. बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल. ज्यांनी फक्त नाव ऐकले त्यांच्या मनात म्युचल फंड म्हणजे काय? ते कसं काम करतं असे अनेक प्रश्न आले असतीलच. म्हणून मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट यात फरक काय ?

मित्रांनो बऱ्याच जणांना म्युच्युअल फंड (Mutual fund) आणि शेअर मार्केट (Share market) हे एकच आहे असं वाटतं. पण हे दोन्ही वेगळे आहे आणि या मध्ये खूप मोठा फरक आहे. शेअर मार्केट मध्ये नफा जास्त आणि रिस्क पण तेवढीच असते. आणि म्युचल फंड मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला यामध्ये पैसे गमावण्याची भीती कमी असते आणि नफा पण शेअर बाजार पेक्षा कमीच असतो.शेअर मार्केट मध्ये तुमचे पैसे कोणत्या तरी एकाच कंपनीमध्ये गुंतवले जातात आणि म्युच्युअल फंड मध्ये मॅनेजर हा तुमचे पैसे थोडे थोडे करून वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवतो.

म्युच्युअल फंड म्हणजे काय ?

मित्रांनो म्युच्युअल फंड म्हणजे, बऱ्याच लोकांचे पैसे वैद्य रीत्या जमा करून ते पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात.आणि म्युच्युअल फंड नेहमी हा विचार करतो की, गुंतवणूक दारांना तोटा नाही झाला पाहिजे, त्यांच्या गुंतवणुकीवर त्यांना नफा कसा मिळेल आणि त्यांचा कसा फायदा होईल याचा विचार म्युचल फंड करतो. म्हणून म्युच्युअल फंड मध्ये पैसे गमावण्याची रिस्क सुद्धा कमी असते.

म्युच्युअल फंड ला सांभाळण्याचे काम व्यवसायिक निधी व्यवस्थापक करत असतात. म्युच्युअल फंड मधील पैशाची योग्य देखभाल व योग्य ठिकाणी ते गुंतवणे हे फंड मॅनेजरचे काम असते.म्युचल फंड मधील पैसा हा एकाच ठिकाणी गुंतवला जात नाही कारण एका कंपनीला जरी तोटा झाला तर बाकीच्या कंपन्या प्रॉफिट देऊन जातात. त्यामुळे तोटा होण्याचे प्रमाण खूप कमी असते.

NOTE-

मित्रांनो अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत तुम्हाला म्युच्युअल फंड काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता आणि आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब चॅनेल
ला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error: ओ शेठ