NEET मध्ये कमी मार्कस आलेत? डॉक्टर नाही होता आलं म्हणून काय झालं? हे आहेत मेडिकल क्षेत्रातील बेस्ट कोर्सेस |Medical courses without neet after 12th

मित्रांनो काही महिन्यांपूर्वी देशभरात विविध वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील UG मेडिकल (MBBS), दंत (BDS), आयुष (BAMS, BHMS, BUMS, BSMS), पशुवैद्यकीय (BVSc आणि AH) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दर वर्षी या परीक्षेसाठी लाखावून अधिक उमेदवारांची नोंदणी होत असते. पण यापैकी बोटावर मोजणे इतकेच विद्यार्थी टॉप कॉलेजला लागत असतात. पण कधी कधी असं होतं की, मार्क्स कमी आल्यामुळे आपला नंबर लागत नाही. त्यावेळेस आपल्याला कळत नाही की, आपण नेमकं काय करावं? पुढे कोणकोणते कोर्सेस आहेत? जे आपण करू शकतो. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

NEET मध्ये कमी मार्कस आलेत? डॉक्टर नाही होता आलं म्हणून काय झालं? हे आहेत मेडिकल क्षेत्रातील बेस्ट कोर्सेस |Medical courses without neet after 12th

NEET व्यतिरिक्त पॅरा-मेडिकल आणि मेडिसिन कोर्सचा पर्याय आहे?

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अनेक पारंपारिक आणि प्रगत यूजी अभ्यासक्रमांचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (BPT), बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (BOT), बॅचलर ऑफ फार्मसी (BPharma), बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस (BNYS) इत्यादी पर्यायांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा असतो आणि त्यानंतर अभ्यासक्रमाशी संबंधित संस्थेत ठराविक कालावधीसाठी इंटर्नशिप करावी लागते.

 • बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (बीपीटी), कालावधी – 4 वर्षे
 • बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी (बीओटी), कालावधी – 4 वर्षे
 • बॅचलर ऑफ फार्मसी (बीफार्मा), कालावधी – 4 वर्षे
 • बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस (BNYS), कालावधी – 4 वर्षे
 • बॅचलर ऑफ सायन्स – नर्सिंग (बीएससी नर्सिंग), कालावधी – 4 वर्षे
 • बॅचलर ऑफ सायन्स – बायोटेक्नॉलॉजी (बीएससी बायोटेक्नॉलॉजी), कालावधी – 4 वर्षे
 • बॅचलर ऑफ सायन्स – मायक्रोबायोलॉजी (बीएससी मायक्रोबायोलॉजी), कालावधी – 4 वर्षे

हे सुध्दा वाचा:- तुमच्याकडे बोलण्याची कला आणि चांगला आवाज असेल, तर तुमच्यासाठी रेडिओ क्षेत्र बेस्ट आहे?

 • बॅचलर ऑफ सायन्स – कार्डिओव्हस्कुलर टेक्नॉलॉजी (बीएससी कार्डिओव्हस्कुलर टेक्नॉलॉजी), कालावधी – 3 वर्षे
 • बॅचलर ऑफ सायन्स – न्यूट्रिशन (बीएससी न्यूट्रिशन), कालावधी – 3 वर्षे
 • बॅचलर ऑफ सायन्स – जेनेटिक्स (बीएससी जेनेटिक्स), कालावधी – 3 वर्षे
 • बॅचलर ऑफ सायन्स – सायबर फॉरेन्सिक (बीएससी सायबर फॉरेन्सिक), कालावधी – 3 वर्षे
 • बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी – बायोमेडिकल (बीटेक बायोमेडिकल), कालावधी – 4 वर्षे

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button