मुलींसाठीची ‘लेक लाडकी योजना’ काय आहे? |lek ladki yojana maharashtra in marathi

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये ‘लेक लाडकी’ ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल.

लेक लाडकी योजना काय आहे? | lek ladki yojana maharashtra in marathi

lek ladki yojana maharashtra in marathi
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना जाहीर करण्यात आली आहे. लेक लाडकी योजनेत (Lek ladki Yojana) वेगवेगळ्या राशनधारकांसाठी वेगवेगळ्या आर्थिक मदतीची तरतूद आहे. या योजनेंतर्गत पिवळे आणि केशरी राशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना लाभ मिळणार आहे. अशा कार्डधारकाच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास तिला 5000 रुपयांची मदत दिली जाईल.

यानंतर मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर तिला पहिल्या वर्गात 4000 रुपये सरकारकडून दिले जातील. आणि सहावीत मुलीला 6000 रुपयांची सरकारी मदत मिळेल. अकरावीत 8000 रुपये दिले जातील तर मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला राज्य सरकारकडून 75 हजार रुपये दिले जातील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ कसा घ्यावा?

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांकडे ही राशनकार्ड आहेत त्यांना सरकारच्या वतीने 2023-24 या आर्थिक वर्षापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात राज्य सरकार लवकरच अधिसूचना जारी करणार आहे.

लेक लाडकी योजना कधी सुरू करण्यात आली?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत मिळणार आहे. या रकमेतून मुलींना शिक्षणादरम्यान सुविधा मिळणार आहेत. महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

Note- मित्रांनो वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी (अडचण) वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवेळेस खात्री करून घ्या.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button