12वी नंतर कायद्याच्या क्षेत्रात करिअर कसे करायचे, याची संपूर्ण माहिती येथून मिळवा |Law courses after 12th in marathi

मित्रांनो 12वी बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. बारावीनंतर आपण कोणत्या क्षेत्रात आपले करिअर करावे ज्यामुळे समाजात चांगले नाव व प्रतिष्ठा मिळवावी, याची चिंता विद्यार्थी व पालकांना सतावत असते. तुम्हाला कायद्याच्या (law courses) क्षेत्रात रस असेल तर कायदा हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही कायद्याच्या क्षेत्रात वकील, न्यायाधीश किंवा प्राध्यापक होऊ शकता.

12वी नंतर कायद्याच्या क्षेत्रात करिअर कसे करायचे, याची संपूर्ण माहिती येथून मिळवा |Law courses after 12th in marathi

करिअर कसे सुरू करावे?

मित्रांनो तुम्ही पण 12वी नंतर कायद्याच्या क्षेत्रात करिअर करू शकता. म्हणजेच 12वीनंतर तुम्ही पाच वर्षांच्या कोर्सला प्रवेश घेऊ शकता. पाच वर्षांच्या कोर्सच्या प्रवेशासाठी, तुम्हाला CLAT, LSAT India, AILET किंवा SET प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पदवीनंतरही law करू शकता.

ग्रॅज्युएशननंतर तुम्ही एलएलबी या 3 वर्षांच्या प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकता. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कायद्याची पदवी मिळेल. तीन वर्षांच्या कोर्सला प्रवेशासाठी तुम्हाला LSAT India, DU LLB, MHT CET किंवा BHU LLB प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. याशिवाय अनेक संस्था थेट पद्धतीनेही प्रवेश देतात. यामध्ये तुम्ही प्रवेश परीक्षा न देताही law ला प्रवेश घेऊ शकता.

हे सुध्दा वाचा:- जेईई मेन उमेदवारांनी कृपया लक्ष द्या, हे काम लगेच करा, नाहीतर अर्ज रद्द होऊ शकतो

या क्षेत्रात पण तुम्ही करिअर करू शकता?

  • कायद्याची पदवी घेतल्यानंतर, तुम्हाला ऑल इंडिया बार परीक्षा (All India bar exam) उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर तुम्ही कोर्टात सराव करू शकता. 7 वर्षांच्या सरावानंतर, उमेदवार उच्च न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश पदावर नोकरी मिळवू शकतात.
  • याशिवाय, जर तुम्हाला वकिली करायची नसेल तर तुम्हाला सहाय्यक अभियोग अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँकिंग क्षेत्रात एसओ इत्यादी पदांवर देखील नोकरी मिळू शकते.
  • या सर्वांशिवाय, जर तुम्हाला शिक्षण क्षेत्रात रस असेल तर तुम्ही प्राध्यापक वगैरे होऊ शकता. प्राध्यापक होण्यासाठी तुम्ही कायद्यातील पदवीनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन (LLM) करू शकता आणि नंतर पीएचडी करू शकता.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button