जुन्या स्मार्टफोन मधून नवीन स्मार्टफोन मध्ये WhatsApp Chat History कशी घ्यायची, नसेल माहित तर ‘या’ स्टेप्स फॉलो करा |How to Transfer WhatsApp Chat History on Android or iOS Using QR Code

मित्रांनो नवीन फोन घेतला आहे. पण व्हाट्सअपची हिस्टरी (WhatsApp Chat History) ही जुन्या मोबाईल मधून नव्या स्मार्टफोन मध्ये घ्यायची आहे. . मित्रांनो आपण पहिले पण हे करू शकत होतो. पण आता व्हाट्सअप ने एक नवीन फीचर आणला आहे. त्याच्यामुळे आपण फक्त एक बारकोड स्कॅन करून संपूर्ण डेटा एका फोन मधून दुसऱ्या फोन मध्ये घेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.

जुन्या स्मार्टफोन मधून नवीन स्मार्टफोन मध्ये WhatsApp Chat History कशी घ्यायची|How to Transfer WhatsApp Chat History on Android or iOS Using QR Code

क्यूआर कोडचा वापर

व्हॉट्सॲपचे नवीन चॅट ट्रान्सफर फीचर वापरकर्त्यांना QR कोड वापरून संदेश, डॉक्युमेंट्स, लिंक्स आणि व्हिडिओंसह मीडिया फाइल्स यांसारखी बहुतांश चॅट माहिती ट्रान्सफर करू देते. पण वापरकर्ते पीअर-टू-पीअर पेमेंट संदेश आणि कॉल हिस्ट्रीवरील डिटेल ट्रान्सफर करू शकणार नाहीत.

या गोष्टी लक्षात ठेवा

QR कोडद्वारे WhatsApp चॅट इतिहास हस्तांतरित करण्यासाठी युजर्सना त्यांच्या दोन्ही फोनमध्ये Android Lollipop 5.1, किंवा Android 6 किंवा त्यापुढील आवृत्ती स्थापित version install) असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन फोनची व्हॉट्सॲपवर नोंदणी केली जाऊ नये. दोन्ही हँडसेट वायफाय सक्षम आणि एकाच नेटवर्कवर असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, iOS वर चॅट ट्रान्सफरसाठी जुन्या आणि नवीन iPhone व्हेरियंटमध्ये iOS आवृत्ती 2.23.9.77 किंवा त्यावरील आवृत्तीसाठी WhatsApp इंस्टॉल असणे आवश्यक आहे.

अँड्रॉइड फोनवर whatsapp चॅट हिस्ट्री ट्रान्सफर कशी करायची?

 • आधी जुन्या फोनवर व्हॉट्सॲप ओपन करा.
 • आता अधिक पर्याय > सेटिंग्ज > चॅट्स > चॅट ट्रान्सफर > स्टार्ट वर जा.
 • नवीन हँडसेटवर तोच नंबर वापरून WhatsApp इंस्टॉल करा आणि मग नोंदणी करा.
 • त्यानंतर जुन्या फोनवरून स्टार्ट ऑन ट्रान्सफर चॅट हिस्ट्री निवडा.
 • आता परवानग्या द्या आणि तुम्हाला एक QR कोड दिसेल. तुमचे जुने डिव्हाइस वापरून हा कोड स्कॅन करा.
 • आता फोनला कनेक्ट करण्याची परवानगी मिळाल्यावर प्रक्रिया सुरू होईल.
 • इम्पोर्ट पूर्ण झाल्यावर, पूर्ण झाले वर या ऑप्शनवर टॅप करा.

हे सुध्दा वाचा:- तुमचे कंटाळवाणे फोटो मजेदार बनवा, हे बेस्ट ॲप्स तुमच्यासाठी

iOS डिव्हाइसवर WhatsApp चॅट हिस्ट्री ट्रान्सफर कशी करायची?

 • सर्व प्रथम जुन्या iPhone वर WhatsApp उघडा.
 • आता सेटिंग्ज > चॅट्स > चॅट्स आयफोनवर ट्रान्सफर करा > स्टार्ट वर जा.
 • नवीन फोनवर, WhatsApp इंस्टॉल करा आणि तुमचा फोन नंबर वापरून नोंदणी करा.
 • आता Continue Transfer Chat History to iPhone निवडा.
 • त्यानंतर जुन्या फोनवर कॅमेरा वापरून तुमच्या नवीन डिव्हाइसवर दाखवलेला QR कोड स्कॅन करा.
 • ट्रान्सपोर्ट पूर्ण झाल्यावर नवीन डिव्हाइसवर आपले प्रोफाइल सेट करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan_Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button