मोबाइल मधल्या Emergency SOS सेटिंगबद्दल माहित आहे का? अडचणीच्या वेळी ही सेटिंग खूप उपयोगी पडेल |How to set up Emergency SOS on your Android phone

मित्रांनो लॉकची सुविधा स्मार्टफोनमध्ये फक्त सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी उपलब्ध आहे. फोन लॉक करण्यासोबतच युजर्सचा फोनही इतरांच्या हातात सुरक्षित राहतो. पण जर तुम्ही अडचणीत असाल आणि अशा वेळी तुमच्या कुटुंबातील सदस्याला किंवा मित्राला कॉल करण्याची गरज भासत असेल तर. आणि तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर अशा परिस्थितीसाठी तुम्ही विशेष सेटिंग इमर्जन्सी एसओएस (Emergency SOS) वापरू शकता.

मोबाइल मधल्या Emergency SOS सेटिंगबद्दल माहित आहे का? अडचणीच्या वेळी ही सेटिंग खूप उपयोगी पडेल |How to set up Emergency SOS on your Android phone

Emergency SOS म्हणजे काय?

फोन व्यतिरिक्त ही सेटिंग तुम्हाला आपत्कालीन संदेश, फोटो आणि 5 सेकंदांचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील संलग्न करण्याची परवानगी देते. आपत्कालीन SOS सह फोनमध्ये 112 इमर्जन्सी क्रमांकची सुविधा ही आधीच पासूनच सुरू असत.पण युजर्स त्याच्या गरजेनुसार या सेटिंगमध्ये स्वतःचे संपर्क देखील जोडू शकता.

आपत्कालीन SOS मध्ये जवळच्याना संपर्क कसा साधायचा?

  • सर्वप्रथम तुम्हाला Android फोनचे सेटिंग ॲप उघडावे लागेल.
  • खाली स्क्रोल करा आणि security किंवा safety and emergency वर टॅप करा.
  • आता नवीन पर्यायामध्ये emergency SOS वर टॅप करा.
  • नंतर emergency call वर टॅप करा.
  • त्यानंतर emergency numbers वर टॅप करा.
  • आता add emergency contact वर क्लिक करा.
  • तुम्‍हाला ज्या contact save करायचा ते add करा.
  • तुम्ही या सेटिंगमध्ये एकापेक्षा जास्त संपर्क सेव्ह करू शकता.

हे सुध्दा वाचा:- मार्केटमध्ये नवीन स्कॅम आलाय, ज्यूस जॅकिंग नावाचा, जसा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावला लगेच बँक खाते हॅक

संकटाच्या वेळी आपत्कालीन SOS वापरण्यासाठी पॉवर बटण तीन वेळा दाबावे लागेल. यानंतर तुमच्या सक्षम सेटिंग्जनुसार तुमची माहिती इतर युजर्सपर्यंत पोहोचेल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button