विमा कंपनीने दावा नाकारल्यास काळजी करू नका, ताबडतोब ‘या’ सरकारी संस्थांकडे तक्रार करा |How to raise a complaint in irdai against insurance company?

मित्रांनो विमा कंपन्या काही वेळा किरकोळ कारणांमुळे सामान्य लोकांचे विमा दावे नाकारतात. या कारणामुळे अनेकांना आपली संपूर्ण बचत खर्च करावी लागते. त्याच वेळी, लोकांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळू शकत नाही परंतु जर एखाद्या कंपनीने एखाद्या व्यक्तीचा दावा नाकारला तर तो त्याबद्दल सरकारी संस्था आणि विमा नियामकाकडे तक्रार करू शकतो. चला तर जाणून घेऊया संपुर्ण माहिती.

विमा कंपनीने दावा नाकारल्यास काळजी करू नका, ताबडतोब या सरकारी संस्थांकडे तक्रार करा |How to raise a complaint in irdai against insurance company?

विम्याचा दावा नाकारल्याबद्दल तक्रार कशी आणि कुठे करता येईल?

  • मिञांनो असे अनेक प्लॅटफॉर्म सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. जिथे तुम्ही विम्याचा दावा नाकारल्याबद्दल सहज तक्रार करू शकता आणि तुमच्या समस्याचे निराकरण लगेच होते.
  • यासाठी तुम्ही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या ‘बिमा भरोसा सिस्टम’ या ऑनलाइन विमा तक्रार पोर्टलवर थेट तक्रार करू शकता.
  • याशिवाय तुम्ही IRDAI च्या ईमेल आयडी complaint@irdai.gov.in वर देखील तक्रार पाठवू शकता. तुम्ही 155255 आणि 1800 4254 732 या टोल-फ्री क्रमांकांवर विमा कंपनीविरुद्ध तक्रार देखील करू शकता.
  • याशिवाय तुम्ही थेट विमा लोकपालाकडे तक्रार करू शकता. पण येथे अट अशी आहे की विमा नाकारल्याच्या एक वर्षाच्या आत तुम्हाला विमा लोकपालकडे तक्रार दाखल करावी लागते.

हे सुध्दा वाचा:- Direct आणि Regular Mutual Fund मध्ये काय फरक आहे?

मी विमा लोकपालाकडे तक्रार कशी करू शकतो?

तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन जाऊन इन्शुरन्स विमा लोकपालाकडे सहजपणे तक्रार नोंदवू शकता. ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला www.cioins.co.in वर लॉग इन करावे लागेल. इन्शुरन्स विमा लोकपालाकडे तक्रार नोंदवण्यासाठी ही अधिकृत वेबसाइट आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या विमा लोकपाल कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button