स्मार्टफोनमध्ये ॲप्स लॉक करायचे आहेत? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to Lock Apps on Your Android Smartphone in marathi

मित्रांनो स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. अशा परिस्थितीत आपली बरीचशी माहिती ही मोबाईल मध्ये असते. बँकिंग डिटेलपासून ते महत्वाचे डॉक्युमेंट, फोटो आणि व्हिडिओ हे फोनमध्ये सेव्ह असतात. पण कधी कधी आपण आपला मोबाईल कोणाच्या देऊन टाकतो. किंवा आपला एखादी मित्र मोबाईल हातातून घेतो त्यावेळेस आपल्या मोबाईल मधील काही खाजगी फोटो किंवा पेमेंट ॲपला.

आपण लॉक केलेले नसते अशा वेळेस आपला जीव कासावीस होतो. यासाठीच आज आम्ही यावर एक सोल्युशन घेऊन आलो आहे. ते म्हणजे ॲप लॉक फीचर. मित्रांनो तुम्हाला यासाठी कोणते थर्ड पार्टी ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल मध्येच ॲप लॉक करण्यासाठी एक फीचर असतं. चला तर जाणून घेऊया या फीचर बद्दल.

स्मार्टफोनमध्ये ॲप्स लॉक करायचे आहेत? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to Lock Apps on Your Android Smartphone in marathi

स्मार्टफोनमध्ये ॲप्स कसे लॉक करावे?

  • अँड्रॉइड फोनमध्ये ॲप्स लॉक करण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जा.
  • आणि खाली स्क्रोल करा आणि सुरक्षा किंवा ॲप्स पर्यायावर टॅप करा.
  • ॲप लॉक पर्याय पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि त्यावर टॅप करा.
  • ॲप लॉकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही फोनमध्ये उपस्थित असलेल्या ॲप्सची संपूर्ण यादी पाहू शकाल.
  • जर तुम्ही पहिल्यांदा ॲप लॉक सेटिंग वापरत असाल तर टॉगल चालू करावे लागेल.
  • यानंतर प्रायव्हसी पासवर्ड सेट केल्यानंतर प्रथम पॉप अप दिसेल.
  • नंतर सेटिंग्जवर टॅप करून पिन सेट करा.
  • आता तुम्हाला कोणतेही ॲप लॉक करायचे असेल तर तुम्हाला त्याच्या शेजारी असलेले टॉगल चालू करावे लागेल.

हे सुध्दा वाचा:- लॅपटॉपची बॅटरी लवकर उतरते, या चुका कारणीभूत ठरू शकतात

ॲप लॉक करण्यासाठी विविध सुरक्षा पर्याय असतात

अँड्रॉइड फोनमधील ॲप्स लॉक करण्यासाठी युजर्सला पॅटर्न, पिन, फेसलॉक किंवा व्हिडिओ फिंगरप्रिंट लॉक सारखे पर्याय मिळतात. येथे जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण, तुम्ही AppLock साठी पहिल्यांदा पासवर्ड किंवा पिन सेट करता तेव्हा ते पुन्हा रीव्हेरीफाय करणे आवश्यक आहे. या प्रकरणात पिन, पासवर्ड सेट केल्यानंतर डिटेल्सची पुन्हा पडताळणी करावी लागेल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button