मर्चंट नेव्हीमध्ये करीअर करायचं आहे? मग जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया |How to join merchant navy after 12th

मित्रांनो मर्चंट नेव्हीची (Merchant Navy) व्याप्ती खूप विस्तृत मानली जाते. या क्षेत्रात सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या उत्कृष्ट पॅकेजवर उपलब्ध आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसोबतच तुम्ही वेगवेगळ्या देशांत फिरण्याचे स्वप्नही पूर्ण करू शकता. यामध्ये व्यापारी जहाजांद्वारे एका ठिकाणाहून किंवा देशातून दुसऱ्या ठिकाणी किंवा देशात मालाची वाहतूक केली जाते.

जर तुमचंही मर्चंट नेव्हीमध्ये (Career in Merchant Navy) सामील होण्याचं स्वप्न असेल, तर आम्ही त्यासंबंधित सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकू शकता.

मर्चंट नेव्हीमध्ये करीअर करायचं आहे? मग जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया |How to join merchant navy after 12th

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी ही पात्रता असणे आवश्यक आहे

मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळविण्यासाठी किंवा अधिकारी होण्यासाठी, तुम्ही प्रथम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने 60 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराचे किमान वय 17 वर्षांपेक्षा कमी आणि कमाल वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होण्यासाठी, बारावीनंतर (after 12th), उमेदवार मरीन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक, मेकॅनिकल इंजिनीअरमध्ये बीई, नॉटिकल सायन्समध्ये बीएस्सी असे विविध अभ्यासक्रम करू शकतात. याशिवाय या क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. जे करून तुम्ही या क्षेत्रातील तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकता.

हे सुध्दा वाचा:- ‘हे’ आहेत 10वी नंतरचे टॉप 5 डिप्लोमा कोर्सेस, मिळेल लखोची पगार

निवड प्रक्रिया काय आहे?

मर्चंट नेव्हीमध्ये निवडीसाठी, उमेदवारांना लेखी परीक्षा/स्क्रीनिंग टेस्ट/मुख्य परीक्षा/मुलाखत इत्यादी विविध टप्प्यांमध्ये उपस्थित राहावे लागते. सर्व प्रक्रियेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणीत सहभागी व्हावे लागते. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाते.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button