दोन हजार रुपयांची नोट घरबसल्या बदलता येते, जाणून घ्या त्याची प्रक्रिया |How to exchange 2000 note at home in marathi

मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर लोकांमध्ये पुन्हा संकटाचे वातावरण आहे. 2016 मध्ये जेव्हा सरकारने नोटाबंदीची घोषणा केली तेव्हा लोकांना नोटा बदलण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागले. यावेळी नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंतच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहील.

जर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन 2000 रुपयांची नोट जमा केली तर त्यावर कोणतेही बंधन नाही.परंतु तुमच्या खात्याचे KYC असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसले तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. तुम्ही एकावेळी फक्त 20 हजार रूपये बदलू शकता. म्हणेच दोन हजाराच्या 10 नोटा. नोटा बदलण्याची प्रक्रिया 23 मे 2023 पासून सुरू झाली आहे.

दोन हजार रुपयांची नोट घरबसल्या बदलता येते, जाणून घ्या त्याची प्रक्रिया |How to exchange 2000 note at home in marathi

नोटा कुठे बदलू शकतो?

तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच तुम्ही RBI च्या 16 प्रादेशिक कार्यालयात जाऊन नोट बदलून घेऊ शकता. आरबीआयने सांगितले की, दुर्गम भागात, म्हणजे ज्या भागात बँक नाही किंवा लांब अंतरावर बँक आहे. तेथे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही.

घरात राहूनही नोट बदलू शकता?

तुम्ही घरी बसूनही नोटा बदलू शकता. जर तुम्हाला बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून नोटा बदलून घेऊ शकता. बँकमित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलतील. असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्ही दररोज 4000 किंवा 2000 रुपयांच्या दोनच नोटा बदलू शकता.

हे सुध्दा वाचा:- 2000 रुपयांची नोट कधी बाजारात आली?सरकारने या चलनाची छपाई का बंद केली?

2000 च्या बनावट नोटांचं काय होणार?

बँकेकडे कोणत्याही प्रकारे 2000 रुपयांची बनावट नोट आढळल्यास बँक ती जप्त करेल. त्या नोटेचे कोणतेही मूल्य ग्राहकाला दिले जाणार नाही. 4 पेक्षा जास्त बनावट नोटा आढळून आल्यास बँक अधिकारी त्या नोटा पोलिसांच्या ताब्यात देतील. पोलीस त्या चिठ्ठीचा तपास करतील. बँक नोट सॉर्टिंग मशिन्सद्वारे (एनएसएम) नोटांची तपासणी करेल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat  @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button