स्मार्टफोन साफ करताना चुकूनही या गोष्टी वापरू नका, नाहीतर सगळे पैसै पाण्यात |How to clean your smartphone safely in marathi

मित्रांनो एकदा का स्मार्टफोन (Smartphone) विकत घेतला की तो अनेक महिने आणि वर्षे वापरला जातो. अशा परिस्थितीत डिव्हाइसची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नाहीतर आपलेच खूप मोठे नुकसान होऊ शकते. चला तर जाणून घेऊया स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे.

स्मार्टफोन साफ करताना चुकूनही या गोष्टी वापरू नका, नाहीतर सगळे पैसै पाण्यात |How to clean your smartphone safely in marathi

स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी कोणती साधने वापरावीत

  • कॉटन स्‍वॅब
  • पेपर टॉवेल
  • टूथपिक
  • मायक्रोफायबर कापड

स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी कोणती साधने वापरू नयेत

  • सेफ्टी पिन
  • सुई
  • कानातले
  • ओले पुसणे
  • अल्कोहोल
  • लिक्विड क्लीनर
  • धारदार शस्त्र
  • ओले कापड,
  • मेटल
  • टूथब्रश

स्मार्टफोन कसा स्वच्छ करावा?

स्मार्टफोनची स्क्रीन आणि इतर भाग स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर केला जाऊ शकतो. मायक्रोफायबर कापडाने फोन स्वच्छ केल्यास डिव्हाइसच्या स्क्रीनवर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅच पडत नाहीत.

जर मोबाईल कोरड्या कापडाने स्वच्छ नसेल करायचा तर तुम्ही कोमट पाण्याने मोबाइल वर 2 ते 3 थेंब टाकून साफ करु शकता. पण असे केल्यास पूर्वीपेक्षा अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे स्मार्टफोनच्या पोर्टला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही हे लक्षात ठेवा.

हे सुध्दा वाचा:- स्मार्टफोनमध्ये दोन नाहीतर एका हाताने टायपिंग करा, गुगल कीबोर्डची ही सुविधा तुम्हाला माहित आहे का?

स्मार्टफोन पोर्ट कसे स्वच्छ करावे?

स्मार्टफोन साफ करताना डिव्हाइसच्या पोर्टची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोनचे पोर्ट हे उपकरणाचे नाजूक भाग असतात. त्यामुळे पोर्ट्स स्वच्छ करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे ते खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

  • सर्व प्रथम स्मार्टफोनच्या पोर्टवर साचलेली घाण काढण्यासाठी टूथपिकचा वापर करा.
  • आता टूथपिकच्या धारदार भागाने गोलाकार हालचालीत छिद्रे साफ करावे लागेल.
  • साचलेली घाण हळूहळू काढून टाकावी लागते.
  • दुसऱ्या वेळेस स्वच्छतेसाठी टूथपिकसह कापसाचे तुकडे वापरावे लागतील.
  • कापसाच्या टूथपिकने देखील गोलाकार हालचालींमध्ये डिव्हाइसचे पोर्ट स्वच्छ करता येते.
  • छिद्रातील सर्व घाण काढून टाकेपर्यंत अशा प्रकारे स्वच्छता करत रहा. जास्त जोर नका लावू नाहीतर टूथपिक मध्ये चालल्या जाईल.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button