10वी आणि 12वी नंतर ग्राफिक डिझायनर बनायचं आहे? मग जॉबसाठी अनेक पर्याय आहेत |How to become a graphic designer after 12th

मित्रांनो विद्यार्थी असोत किंवा त्यांचे पालक, प्रत्येकालाच आपल्या मुलाने असे काहीतरी करावे, की त्याला लवकरात लवकर नोकरी मिळावी, याची चिंता असते. तुम्हीही असा विचार करत असाल आणि तुम्ही सर्जनशील असाल तर ग्राफिक डिझायनिंग (Graphic designer) कोर्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

हे कोर्स डिप्लोमा/डिग्री/सर्टिफिकेट स्तरावर उपलब्ध आहेत ज्यात तुम्ही दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यावरच प्रवेश घेऊ शकता. हे कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून काम (How to become a graphic designer after 12th) करू शकता.

10वी आणि 12वी नंतर ग्राफिक डिझायनर बनायचं आहे? मग जॉबसाठी अनेक पर्याय आहेत |How to become a graphic designer after 12th

नोकरीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत

मित्रांनो सध्या जग हे सोशल मीडियाचे युग आहे. अशा स्थितीत देशातील प्रत्येक लहान-मोठा राजकीय पक्ष, छोट्या-मोठ्या कंपन्या आणि अगदी सरकारी कंपन्याही आपल्या प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझायनर्सना चांगल्या पगारावर नियुक्त करतात.

10वी, 12वी नंतर सुरू करता येईल

जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल आणि तुम्ही नुकतीच 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाला असेल, तर तुमच्यासाठी या क्षेत्रात पूर्णवेळ अंडरग्रॅज्युएट पदवी घेणे अधिक चांगले होईल. याशिवाय तुम्ही डिप्लोमा देखील मिळवू शकता. जर तुम्ही ग्रॅज्युएशन केले असेल तर डिप्लोमा तुमच्यासाठी अधिक चांगला असेल.

हे सुध्दा वाचा:- डिजिटल बँकिंग म्हणजे काय? यामध्ये करिअर कसे करायचे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सुरुवातीचा पगार 10 ते 25 हजार रुपये असू शकतो

या क्षेत्रात तुम्ही 10 ते 25 हजार रुपये प्रति महिना पगार घेऊन सुरुवात करू शकता, परंतु वेळ आणि अनुभवानुसार हा पगार लाखांपर्यंत पोहोचतो. आपण प्रत्येक प्रोजेक्टच्या आधारावर देखील काम करू शकतो. या क्षेत्रात फ्रीलान्सर म्हणून काम करण्याबरोबरच अनुभव मिळवल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची कंपनी उघडून लोकांच्या प्रसिद्धीसाठी ग्राफिक डिझाइनही करू शकता.

चित्रपट आणि जाहिरातींच्या दुनियेत तूम्ही काम करू शकता

जर तुम्हाला वर दिलेल्या क्षेत्रात काम करायचे नसेल, तर तुम्ही चित्रपटसृष्टीतही करिअर करू शकता. इथे तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला लाखात पगार मिळतो. तसेच टी.व्ही क्षेत्रात सुद्धा काम करू शकता.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button