तुमच्यातही क्रिएटिव्हिटीचा किडा असेल, तर तुम्ही फॅशन डिझायनर बनून तुमचे भविष्य उज्वल करा |How to become a fashion designer after 12th

मित्रांनो जगभरातील लोकांची फॅशनबद्दलचे विचार हे बदलत चालले आहेत. या बदलत्या ट्रेंडमध्ये फॅशन ही एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. फॅशनच्या संदर्भात बाजारात विविध बदल पाहायला आपल्याला मिळतात. फॅशनच्या या जमान्यात लोकं आपल्या कपड्यांकडे आणि स्टाइलकडे खूप लक्ष देऊ लागले आहेत. मग ते श्रीमंत असोत की गरीब. या फॅशनमुळे या क्षेत्रात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जर तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आणि फॅशनची जाण असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. या क्षेत्रात येण्यासाठी विविध उपलब्ध कोर्सेस करून तुम्ही व्यावसायिक फॅशन डिझायनर (fashion designer) बनू शकता.

तुमच्यातही क्रिएटिव्हिटीचा किडा असेल तर तुम्ही फॅशन डिझायनर बनून तुमचे भविष्य उज्वल करा |How to become a fashion designer after 12th

12वी नंतरच सुरू करु शकता

फॅशन डिझायनर होण्यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण झाल्यावरच या क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. अंडर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट असे सर्व प्रकारचे कोर्स फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करता येतात. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन शिक्षण घेता येते. याशिवाय तुम्ही नंतर उच्च शिक्षणासाठी मास्टर्स कोर्सलाही प्रवेश घेऊ शकता. या क्षेत्रात, काही संस्था प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात तर अनेक संस्था गुणवत्ता यादी आणि थेट पद्धतीने प्रवेश देखील देतात.

फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील काही प्रमुख कोर्सेस

  • बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग
  • फॅशन डिझायनिंगमध्ये बीएससी
  • बॅचलर ऑफ फॅशन कम्युनिकेशन
  • डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग
  • डिप्लोमा इन फॅशन स्टायलिस्ट
  • फॅशन डिझायनिंगमध्ये एम.ए
  • फॅशन डिझायनिंगमध्ये पीजी डिप्लोमा
  • फॅशन मॅनेजमेंट मध्ये मास्टर

तुम्हाला कोणत्या पदांवर नोकरी मिळेल?

फॅशन डिझायनिंग कोर्स केल्यानंतर तुम्हाला फॅशन डिझायनर, टेक्निकल डिझायनर, फॅशन कोऑर्डिनेटर, फॅशन मार्केटर अशा विविध पदांवर नोकरी मिळू शकते. यासह तुम्ही फॅशन शो आयोजक आणि सेलिब्रिटी किंवा मोठ्या फॅशन स्टायलिस्टचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून देखील सुरुवात करू शकता. तुमची पात्रता आणि अनुभवानुसार तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. काम नीट शिकल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँडही तयार करू शकता.

हे सुध्दा वाचा:- हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी करिअर घडवण्यासाठी ही कौशल्ये महत्त्वाची आहेत? जाणून घ्या

तुम्हाला किती पगार मिळेल?

या क्षेत्रात सुरुवातीला तुम्हाला 12 ते 20 हजार रुपये दरमहा पगार मिळू शकतो. अनुभव आणि पात्रतेच्या आधारे नंतर वाढत जाते. एखाद्या सेलिब्रिटी किंवा मोठ्या कंपनीसाठी तुम्हाला लाखो रुपये पगार मिळू शकतो. याशिवाय जर तुम्हाला कोणासाठी काम करायचे नसेल तर तुम्ही स्वत:चा स्वयंरोजगारही सुरू करू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button