ड्रोन पायलट म्हणून करीअर करायचं आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to become a drone pilot in india

मित्रांनो तुम्ही म्हणाल, ड्रोन पायलट (Drone Pilot) म्हणून पण करिअर करता येतं का? तर याचं उत्तर हे हो आहे. कारण जगभरात वेगाने तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. ड्रोन उद्योग या तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने विकसित झाला आहे आणि येत्या काही वर्षात तो वेगाने वाढेल अशी अपेक्षा आहे. पूर्वीच्या काळी ड्रोनचा वापर फारच मर्यादित होता.

पण आता विवाहसोहळ्यांव्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्र, कृषी क्षेत्र, चित्रपट उद्योगात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. ड्रोनच्या माध्यमातून एकाच ठिकाणी बसून कमी वेळात जास्त काम आणि जास्त क्षेत्र कव्हर करता येते. पण हे काम ड्रोन पायलटने केले आहे. ड्रोन पायलट रिमोटद्वारे ड्रोन उडवतो. चला तर मग जाणून घेऊया Drone Pilot होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.

ड्रोन पायलट म्हणून करीअर करायचं आहे? मग ही माहिती तुमच्यासाठी |How to become a drone pilot in india

तुम्ही ड्रोन पायलट देखील बनू शकता

जर तुमचेही ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न असेल तर तुम्ही ते 10वी/12वी नंतरच सुरू करू शकता. ड्रोन पायलट होण्यासाठी सरकार पण प्रशिक्षणही देते. यासाठी तुम्हाला डीजीसीएकडून प्रशिक्षण घ्यावे लागे.

मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल

ड्रोन पायलट होण्यासाठी तुम्हाला डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणासाठी संस्थेने ठरवून दिलेली फी जमा करून प्रवेश घ्यावा लागेल. यानंतर तुम्हाला ड्रोन तंत्रज्ञान (Drone technology) समजून घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

हे सुध्दा वाचा:- 12वी नंतर पर्यटन क्षेत्रात करिअर करायचं आहे? मग हा कोर्स तुमच्यासाठी

प्रशिक्षणानंतर उमेदवाराला वैद्यकीय चाचणीत हजर राहावे लागते. या टप्प्यातील यशस्वी उमेदवारांना DGCA द्वारे प्रमाणपत्रे प्रदान केली जातात. ड्रोन पायलट किंवा ड्रोन तंत्रज्ञानाशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही सरकारी वेबसाइट डिजिटल स्कायला देखील भेट देऊ शकता. प्रशिक्षण घेतल्यानंतर उमेदवार या क्षेत्रात आपले करिअर करू शकतात.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink
Instagram Group Follow करा
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button