आधार आणि पॅनशिवाय कॅशमध्ये किती सोने खरेदी करता येते? जाणून घ्या काय आहे इन्कम टॅक्स नियम |How much gold can be purchased without PAN card?

मित्रांनो सोने खरेदी करणे सर्वांनाच आवडते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सोन्यात गुंतवलेली रक्कम गमावण्याचा धोका नसतो आणि कालांतराने त्यातून चांगला परतावाही मिळतो. परंतु सोन्यात गुंतवणूक करताना रोख रकमेत गुंतवणूक करणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातल्या त्यात लिमिट किती आहे हा सुद्धा प्रश्न पडतो. पॅन आणि आधारशिवाय किती सोने खरेदी (gold purchase cash limit) करता येते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आधार आणि पॅनशिवाय कॅशमध्ये किती सोने खरेदी करता येते? जाणून घ्या काय आहे इन्कम टॅक्स नियम |How much gold can be purchased without PAN card?

तुम्ही कॅशमध्ये किती सोने खरेदी करू शकता?

कॅशमध्ये सोने खरेदी करताना किती रक्कम भरावी लागेल याबाबत प्राप्तिकर कायद्यात कोणताही नियम नाही. पण रोखीने सोने विकताना पैसे मिळण्याबाबत नियम कडक आहेत. कोणताही विक्रेता एकाच व्यवहारात रु. 2 लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारू शकत नाही. यामुळे कोणताही खरेदीदार कॅशमध्ये कितीही रकमेचे सोने खरेदी करू शकतो. परंतु विक्रेत्याला एका व्यवहारात केवळ 2 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे सोने कॅशमध्ये विकता येते.

पॅन आणि आधारशिवाय तुम्ही किती सोने खरेदी करू शकता?

तुम्ही दोन लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी केल्यास तुम्हाला पॅन आणि आधार आवश्यक आहे. त्याच वेळी तुम्ही पॅन आणि आधारशिवाय 2 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीचे सोने खरेदी करू शकता.

हे सुध्दा वाचा:- बाप रे, एकाच पॉलिसीमध्ये 5 गाड्यांचे इन्शुरन्स कव्हर होतात? जाणून घ्या संपूर्ण माहिती

2 लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारल्यास किती दंड आकारला जातो?

कोणत्याही ज्वेलर्सने 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारत असेल तर त्याला स्वीकारलेल्या रकमेनुसार दंड आकारला जातो.

सोने खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे का?

पॅन/आधार आवश्यक आहे

रोखीने सोने खरेदीची मर्यादा किती आहे?

2 लाख रूपये आहे

मी सोने रोखीने विकू शकतो का?

इमर्जन्सी कॅशसाठी तुम्ही सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने विकू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button