आधार कार्डमधील ही माहिती एकदाच बदलता येते, जाणून घ्या संपूर्ण माहिती |How many times can you update name, date of birth, address on Aadhaar card

मित्रांनो आधार कार्ड (Aadhaar card) हे ओळखपत्र म्हणून काम करते. ते ओळखीचे साधन म्हणून वैयक्तिक तसेच सरकारी कामासाठी वापरले जाते. पण कधी कधी आधारमध्ये दिलेली माहिती अपडेट करावी लागते. ही माहिती बदलण्याची मर्यादा आहे. यात तुम्ही कितीवेळा माहिती बदलू शकता हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर आज आपण जाणून घेणार आहोत याबद्दल सविस्तरपणे.

आधार कार्डमधील ही माहिती एकदाच बदलता येते, जाणून घ्या संपूर्ण माहिती |How many times can you update name, date of birth, address on Aadhaar card

यामध्ये एकदाच बदलहोतो

तुम्ही आधार कार्डवर फक्त एकदाच लिंग आणि जन्मतारीख बदलू शकता. तर नाव फक्त दोनदा बदलता येते. आधार कार्डमध्ये तुम्ही तुमचा निवासी पत्ता बदलू शकता. तुमच्या घराचा पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा इतर कोणताही पत्ता पुरावा द्यावा लागेल. ही सर्व माहिती तुम्ही ऑनलाईन देखील अपडेट करू शकता.

ही माहिती तीन वेळा बदलली जाऊ शकते

तुम्ही तिसऱ्यांदा तुमचे नाव बदलल्यास, त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. अनेक वेळा तुमचे नाव अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन परवानगी घ्यावी लागेल. आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा कागद आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये.

हे सुध्दा वाचा:- आर्थिक ध्येय का महत्त्वाचे आहे? आपल्याला त्याचा फायदा कसा मिळतो?

याशिवाय तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. आजकाल आधार कार्डच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. ही फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तुमची आधार माहिती कोणालाही देऊ नका. याशिवाय तुमच्या मोबाईलवर मिळालेला आधार ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पाठवू नका. असे केल्यास तुमची फसवणूक होऊ शकते.

Telegram Grouplink
WhatsApp Channellink

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button