गुन्हा दाखल झाल्यास किंवा FIR दाखल झाल्यास मला सरकारी नोकरी मिळू शकते का? यासाठी नियम काय आहेत? |Does a person with criminal record eligible to become civil servant

मित्रांनो प्रत्येक MPSC किंवा UPSC करणाऱ्याच्या मनात हा प्रश्न नक्की येत असतो. पण सरकारी नोकरी मिळणे एवढे सोपे नाही. यासाठी फक्त खडतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात असे नाही तर सरकारने जारी केलेल्या अनेक नियमांचे पालन करावे लागते. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा अर्ज करताना काहीही लपविल्यास उमेदवारावर कठोर कारवाई होऊ शकते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून आपापसात भांडतात.

काही वेळा प्रकरण चिघळते आणि पोलिसांपर्यंत पोहोचते आणि आपल्यावर एखादी गुन्हा दाखल होऊ शकतो. पण आता एक प्रश्न पडतो तो म्हणजे, जर एखाद्यावर गुन्हा दाखल झाला असेल किंवा एफआयआर दाखल झाला असेल तर तो सरकारी नोकरीसाठी पात्र (Sarkari Naukri Rules) आहे का? चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर काय आहेत ते.

गुन्हा दाखल झाल्यास किंवा FIR दाखल झाल्यास मला सरकारी नोकरी मिळू शकते का? यासाठी नियम काय आहेत? |Does a person with criminal record eligible to become civil servant

सरकारी नोकरीचे नियम काय आहेत? |Government Jobs Rules

  1. कोणत्याही सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना, तुम्हाला त्या संबंधित सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला फायदा होईल. जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल किंवा तुम्हाला सरकारी नोकरीतून निलंबित केले जाईल, असे होऊ नये यासाठी तुम्ही, एफआयआर किंवा कोणताही गुन्हा दाखल झाल्यास सरकारी नोकरीचे नियम काय आहेत ते जाणून घेतले पाहिजेत.
  2. सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड लपवण्याची चूक करू नका. तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवली, पण नंतर तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड समोर आला, तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते.
  3. साधारणपणे, अर्जदारांना स्वतःचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे लागते. ते फॉर्म भरण्यासाठी केले जातात. त्यात त्यांना सांगावे लागेल की त्यांना यापूर्वी अटक झाली आहे का नाही? किंवा त्याला कधी तुरुंगात जावं लागलं आहे का नाही? तो कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरला आहे का नाही, त्याच्यावर खटला प्रलंबित आहे का नाही? या सर्व गोष्टी सांगावे लागतात.
  4. जर एखाद्या व्यक्तीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर त्याचा अर्ज या आधारावर रद्द करता येणार नाही. त्याच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्याची श्रेणी येथे महत्त्वाची आहे. शेजाऱ्यांशी भांडण किंवा इतर लहानसहान बाबींमध्ये काही हरकत नाही.

हे सुध्दा वाचा:- IPS अधिकारी होण्यासाठी उंची आणि वजन किती पाहिजे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

  1. ज्या प्रकरणांमध्ये व्यक्तीचे नैतिक अध:पतन होण्याची शक्यता असते (उदा., बलात्कार, दरोडा, खून, अपहरण इ.) त्याचे नाव दिसल्यास, सरकारी नोकरी मिळण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत फक्त सरकारी नोकऱ्याच नव्हे तर खासगी नोकऱ्याही धोक्यात येऊ शकतात.
  2. जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल आणि त्याच्यावर एफआयआर नोंदवला असेल तर सरकार त्याला नोकरीवरून काढू शकत नाही. मात्र आरोप सिद्ध होऊन खटल्याचा निकाल त्याच्यावर आल्यास त्याची सरकारी नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे.
Telegram Grouplink
WhatsApp Channellink
जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button