वांगी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Aubergine health benefits in marathi

मित्रांनो अनेक गुणांनी युक्त अशी वांग्याची भाजी थंडीच्या दिवसांमध्ये अत्यंत आवडीने खाल्ली जाणारी लोकप्रिय भाजी आहे. महाराष्ट्रात काळ्या, पांढऱ्या रंगाची, गोल व लांबट आकाराची आणि काटेरी असे वांग्याचे प्रकार आढळतात. कोवळी वांगी गुणकारी व शक्तिवर्धक असतात.

वांगी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Aubergine health benefits in marathi

  • वांगी (Aubergine) उष्ण, ताप, वायू, कफहारक, मधुर, तीष्ण, वीर्यवर्धक, पचण्यास हलकी, अग्नीप्रदीपक असतात. लहान वांगी कफ व पित्तकारक असतात.
  • पोट जड झाल्यास वांगी विस्तवावर भाजून त्यात सोडा घालून त्याचे मिश्रण एकजीव करून पोटावर बांधावे.
  • वांग्याचे पोटीस गळवावर बांधल्यास गळू लवकर पिकते व फुटते.
  • वांगे भाजावे व त्यात दही घालून ते मिश्रण नारू झालेल्या ठिकाणी लावावे त्यामुळे फायदा होतो.
  • वांगे व टॉमेटो यांचे सूप करून प्यावे. मंदाग्नी, भूक न लागणे, अन्न न पचणे आदी विकार दूर होतात.
  • कोवळे वांगे विस्तवावर भाजावे व त्यात मध घालून ते वाटण खाल्ल्याने चांगली झोप येते. निद्रानाशावर फायदा होतो.
  • वांग्याचे भरीत किंवा भाजीमध्ये हिंग व लसूण घालून खाल्ल्याने पोटात गुबारा धरणे, वायुगोळा उठणे आदी विकार दूर होतात.
  • मलेरियाच्या तापामध्ये शरीर पिवळे पडल्यास कोवळे वांगे विस्तवावर भाजून रोज सकाळी रिकाम्या पोटी गुळाबरोबर खावे.

हे सुध्दा वाचा:जास्त प्रमाणात सप्लिमेंट्स सेवन केल्याने शरीराला अशा प्रकारे नुकसान होते

  • धोत्र्याचे विष उतरण्यासाठी वांग्याचा 50 मि. लि. रस काढून प्यावा.
  • अंडवृद्धी झाल्यास वांग्याच्या झाडाचे मूळ थंड पाण्यात उगाळून अंडावर त्याचा लेप करावा.
  • वांगे उष्ण असल्याने ते वारंवार खाऊ नये तसेच उष्ण प्रकृतीच्या लोकांनी, पित्तप्रकृती, आम्लपित्त व मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी वांग्याचे सेवन बेतानेच करावे. वांग्याच्या अतिरेकी, अमर्याद सेवनामुळे वीर्य पातळ होते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button