सरकार दरमहा देईल 5000 रुपये, फक्त तुम्हाला या ठिकाणी गुंतवणूक कराव लागेल |Atal pension yojana government will give a pension of rs 5000

मित्रांनो कर्मचार्‍यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सामाजिक-आर्थिक सुरक्षेची काळजी घेत केंद्र सरकार देशात अटल पेन्शन योजना ( Atal Pension Yojana) राबवत आहे. ज्यामध्ये तुम्हाला विशिष्ट वयानंतर दरमहा 5,000 रुपये मिळू शकतात.

सरकारच्या या योजनेकडे लोकांचा कल झपाट्याने वाढत आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च 2023 मध्ये, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS), NPS Lite, अटल पेन्शन योजनेच्या एकूण सदस्यांची संख्या 624.81 लाख झाली आहे.

सरकार दरमहा देईल 5000 रुपये, फक्त तुम्हाला या ठिकाणी गुंतवणूक कराव लागेल

वयाच्या 60 नंतर दर महिन्याला पेन्शन दिली जाईल

अटल पेन्शन योजना (APY) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. ज्याचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत देणे आहे.

तुम्ही दरमहा फक्त 42 रुपये गुंतवू शकता

अटल पेन्शन योजनेत निश्चित रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा किमान 42 रुपये आणि कमाल 1454 रुपये योगदान द्यावे लागेल. जर तुम्ही दरमहा 42 रुपये गुंतवले तर वयाच्या 60 नंतर तुम्हाला दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळेल. दुसरीकडे दरमहा 1454 रुपये जमा केल्यास वयाच्या 60 वर्षांनंतर 5,000 रुपये पेन्शन मिळेल.

हे सुद्धा वाचा: तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी

याठिकाणी अटल पेन्शन खाते उघडा

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून आणि मासिक आधारावर गुंतवणूक करण्यासाठी रक्कम निवडून गुंतवणूक सुरू करू शकता. यानंतर वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा गुंतवलेल्या रकमेवर आधारित पेन्शन दिली जाईल.

APY योजना एवढी लोकप्रिय का आहे?

अटल पेन्शन योजनेच्या सुरुवातीपासून नावनोंदणी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2021-22 च्या तुलनेत 2022-23 मध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. योजनेची एकूण AUM रु. 28,434 कोटींहून अधिक आहे आणि योजनेने सुरुवातीपासून 8.92 टक्के गुंतवणूक परतावा मिळवला आहे.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button