जगातील सर्वात महाग कापड कोणते आहे? किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल |World’s most expensive fabric information in marathi

मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन कामकाजाच्या आयुष्यात एकापेक्षा जास्त महागड्या कपड्याबद्दल जरूर ऐकलं असेल. किंवा ते कपडे पाहिले असेल तसेच ते परिधान देखील केले असेल. बरेच नामांकित ब्रँडचे कपडे किंमतीने महाग असतात. तर काही नामांकित ब्रँडच्या कपड्यावर दागिन्यांसह भरतकाम केलेले असते. पण असे देखील नामांकित कपडे आहेत त्याची महागाई त्याच्या फॅब्रिकमुळे आहे. असेच एक नामांकित फॅब्रिक (fabric) आहे ज्याचं नाव विकुना (Vicuna) अस आहे. विकूना या फॅब्रिकला जगातील सर्वात महागडे फॅब्रिक म्हणून ओळखले जाते. विकुना या ब्रँडची किंमत एवढी आहे की त्यापासून बनवलेले मोजे खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमची गाडी (अर्थात कर) विकावी लागेल.

जगातील सर्वात महाग कापड कोणते आहे? किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल |World’s most expensive fabric information in marathi

विकूना हे फॅब्रिक किती महाग आहे?

जगातील सर्वात महाग फॅब्रिक असलेल्या विकुनाच्या किंमतीचा अंदाज तुम्ही त्यापासून निर्मित केलेल्या कपड्यांच्या किंमतीवरून लावू शकता. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की विकुना (Vicuna) या फॅब्रिकपासून बनवलेल्या मोज्याची किंमत सरासरी 80 हजारापासून सुरू होते. जर तुम्हाला विकून या फॅब्रिकचा टी-शर्ट घ्यायचा असेल तर तुम्हाला लाखो रुपये मोजावे लागतील.

विकुना फॅब्रिकपासून निर्मित कपडे या वेबसाईटवर उपलब्ध आहे?

विकुना फॅब्रिकपासून निर्मित असलेले कपडे लोरो पियाना या इटालियन कंपनी लोरो पियानाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर विकूना फॅब्रिकपासून बनवलेल्या मोज्याच्या जोडीची किंमत 80 हजार रुपये पेक्षा जास्त आहे. तर एका शर्ट ची किंमत सरासरी 5 लाख रुपये पेक्षा जास्त आहे. विकुना या फॅब्रिकपासून बनवलेल्या पेंटची किंमत 8 लाखापेक्षा जास्त आहे. तसेच जर तुम्हाला विकूना या फॅब्रिकचा कोट खरेदी करायचा असेल तर तो 11 लाख रुपयांच्या वरती मिळेल.

हे सुद्धा वाचा: भारतीय चलन कोणत्या देशात चालतात आणि का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

विकुना हे फॅब्रिक इतके महाग का आहे?

विकुना या फॅब्रिक (fabric) ची किंमत जास्त असण्याचे कारण हे की ते उंटाच्या केसापासून बनवले जाते विशेष म्हणजे ज्या लोकरापासून ते तयार केले जाते ते सामान्य उंट नसून उंटाची एक अतिशय खास प्रजाती आहे, ही प्रजाती केवळ दक्षिण अमेरिकेतील विशिष्ट भागात आढळते. ही प्रजाती झपाट्याने नामशेष होत आहेत. सन 1960 मध्ये त्यांना दुर्मिळ प्रजाती म्हणून सांगण्यात आले. त्यानंतरच्या पुढील वर्षापासून ते पाळण्यासाठी कडक नियम करण्यात आले.

या प्रजातीच्या उंटातून बाहेर पडणारी जाडी 12 ते 14 मायक्रोन असते. हे फॅब्रिक एवढे उबदार असते की तुम्ही खूप थंडीच्या दिवसात फॅब्रिक पासून बनवलेले जॅकेट घातले तर तुम्हाला किंचितही थंडी वाजणार नाही. विशेष म्हणजे विकूना या फॅब्रिकपासून बनवलेल्या कपड्यांची किंमत जास्त असण्याचे कारण म्हणजे विकुना लोकरपासून कोट बनवण्यासाठी सुमारे अंदाजीत 35 उंटांची लोकर काढावी लागते.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button