पहिल्यांदा विमा घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला कमी प्रीमियममध्ये अधिक कव्हरेज मिळेल |5 tips for first-time car insurance buyers in marathi

मित्रांनो अनेक तरुण हे वयाच्या 25 वर्षी विमा ( insurance) घेण्यास टाळाटाळ करतात. याचे कारण म्हणजे वयाच्या या टप्प्यावर तरुणांना असे वाटते की त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण जितक्या लवकर विमा काढला जातो तितकाच तो फायदेशीर राहतो. विमा तज्ज्ञ सुध्दा हेचं सांगतात. जर तुम्ही पण पहिल्यांदा विमा काढत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

पहिल्यांदा विमा घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्हाला कमी प्रीमियममध्ये अधिक कव्हरेज मिळेल |5 tips for first-time car insurance buyers in marathi

एक्स्ट्रा लाईफ कव्हर

तरुण वयात विमा घेण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला खूप कमी प्रीमियममध्ये अधिक कव्हरचा लाभ मिळतो. साधारणपणे तुम्ही तुमच्या सरासरी उत्पन्नाच्या 15 ते 20 पट लाइफ कव्हर घेतले पाहिजे.

स्वतंत्र योजना

अनेक नियोक्ते कर्मचार्‍यांना समूह विमा योजना ऑफर करतात. जेणेकरून कर्मचार्‍यांना आर्थिक सुरक्षा मिळते. या ग्रुप इन्शुरन्सचा लाभ कर्मचारी कंपनीत काम करेपर्यंतच मिळतो. या कारणास्तव नेहमी स्वतंत्र विमा योजना घेणे आवश्यक आहे.

नॉमिनी भरणे आवश्यक आहे

विमा घेताना नेहमी नॉमिनीचे नाव टाका. याद्वारे तुमच्या प्रिय व्यक्तीला कोणतीही अनुचित घटना घडल्यास पैसे मिळू शकतात. अन्यथा नॉमिनी न मिळाल्यास कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

कर लाभ

विमा योजनेत गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कलम 80C, कलम 10(10D) आणि आयकराच्या कलम 80D अंतर्गत सूट मिळते. यामुळे तुम्हाला कराचा बोजा कमी होण्यासही मदत होईल.

हे सुध्दा वाचा:- Saving account मध्ये किती पैसे ठेवता येतात? आयकर नियम काय आहेत?

अतिरिक्त रायडर्सचा फायदा

कोणताही विमा घेताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार अपघात किंवा कोणत्याही विशिष्ट आजारासाठी अतिरिक्त रायडर्स घ्यावेत. जर तुम्ही हे रायडर्स 25 च्या आधी घेतले तर त्यांची किंमत खूपच कमी आहे आणि कोणताही रायडर सहज उपलब्ध आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रायडर्स काय आहे? मूळ विमा योजनेसोबत विमेदाराला काही ‘अतिरिक्त लाभ देणारी तरतूद’ म्हणजे रायडर्स.

Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button