सरकारी नोकरीसाठी कोणते computer course आवश्यक आहेत? जाणून घ्या महत्त्वाची माहिती |Which computer certificate did I need for a government job?

मित्रांनो सध्या सरकारी नोकरी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. सरकारी नोकरी लक्षात घेऊन उमेदवार अभ्यासक्रम निवडतात. मात्र गेल्या काही वर्षांत संगणक आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकच अभ्यासक्रम करणे पुरेसे मानले जात नाही. आजच्या काळात संगणक आणि तंत्रज्ञानाने खाजगी क्षेत्राबरोबरच सरकारी क्षेत्रातही आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आता अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये संगणक अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर यासोबतच हे कॉम्प्युटर कोर्स (computer certificate) तुम्हाला नोकरी मिळवण्यात मदत करतील. या अभ्यासक्रमांची माहिती आपण या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.

सरकारी नोकरीसाठी कोणते computer course आवश्यक आहेत? जाणून घ्या महत्त्वाची माहिती |Which computer certificate did I need for a government job?

“O’ लेव्हल कॉम्प्युटर कोर्स

हा एक कॉम्प्युटर डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही डेटा एन्ट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये तांत्रिक सहाय्यक अशा अनेक पदांवर भरतीसाठी पात्र ठरता. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU). भारतीय रेल्वे, बँकिंग, संरक्षण, एसएससी यासह अनेक भरतींमध्ये सहभागी होऊ शकते. हा कोर्स तुम्ही पूर्णवेळ अभ्यासक्रमासोबत करू शकता.

CCC कॉम्प्युटर कोर्स |CCourse on Computer Concepts

या अभ्यासक्रमाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असून त्याचे संपूर्ण नाव Course on Computer Concepts असे आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही लिपिक, लघुलेखक, पटवारी इत्यादी पदांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकता.

हे सुध्दा वाचा:- करिअर डेव्हलपमेंट म्हणजे काय? आणि तो का महत्त्वाचा आहे?

बीसीए (बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन)

बीसीए हा पदवी अभ्यासक्रम आहे ज्याचा कालावधी 3 वर्षांचा आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. एसएससी, रेल्वे बँकिंग, महसूल विभाग, आयकर विभाग यासह हा कोर्स केल्यानंतर अनेक नोकऱ्या आहेत. याशिवाय असे अनेक कोर्सेस आहेत जे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करू शकतात. यापैकी काही अभ्यासक्रम म्हणजे,

  • DEO (डेटा एंट्री ऑपरेटर)
  • ADCA (Advance Diploma in Computer Application),
  • B.Sc आणि M.Sc in Computer Science इत्यादी.

मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे तर नक्की शेअर करा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button