भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Rinku Singh Biography in Marathi

मित्रांनो रिंकू सिंग (Rinku Singh) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो. आज आपण या पोस्ट मध्ये रिंकू सिंग याच्या आतापर्यंतच्या लाईफबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? |Rinku Singh Biography in Marathi

रिंकू सिंग हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो डाव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाज करतो. जो आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे.

रिंकू सिंगचा जीवन परिचय

रिंकू सिंग ही भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील आहे. रिंकू सिंग यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी अलिगढ, उत्तर प्रदेश राज्यात झाला. रिंकू सिंगचे पूर्ण नाव रिंकू खानचंद सिंग आहे. रिंकू सिंग वय 25 वर्षे आहे (2023 प्रमाणे). तो डाव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हात ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. तो त्याच्या संघात मधल्या फळीत फलंदाजी करतो.

रिंकू सिंग यांच्या कुटुंबाबद्दल |About Rinku Singh’s family

रिंकू सिंगचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. रिंकू सिंगच्या कुटुंबात त्याचे आई-वडील राहतात. खानचंद सिंग असे रिंकू सिंगच्या वडिलांचे नाव असून ते एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवण्यासाठी घरोघरी जात असत. रिंकू सिंगच्या आईचे नाव वीणा देवी असून ती ग्रहणी आहे. त्याला 2 भावंडे देखील आहेत.जितू सिंग असे भावाचे नाव असून तो पूर्वी ऑटो रिक्षा चालवत असे. त्याच्या बहिणीचे नाव नेहा सिंग आहे.

रिंकू सिंगचे शिक्षण |Education of Rinku Singh

रिंकू सिंगने अलिगडमधूनच शिक्षण घेतले आहे. कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही.

हे सुध्दा वाचा:- चेन्नई सुपर किंग्सचा सुपरस्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

रिंकू सिंगची क्रिकेट कारकीर्द |Cricket career of Rinku Singh

  • रिंकूने 16 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील स्तरावर उत्तर प्रदेशचे आणि 19 वर्षांखालील स्तरावर मध्य विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • 5 मार्च 2014 रोजी, त्याने वयाच्या 16 व्या वर्षी उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए मध्ये पदार्पण केले, जिथे त्याने 87 चेंडूत 83 धावा केल्या. 31 मार्च 2014 रोजी, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भाविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले, जिथे त्याने 5 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या.
  • या सामन्यातून जितेश शर्मा आणि कुलदीप यादव यांनीही टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
  • त्याने 5 नोव्हेंबर 2016 रोजी 2016-17 रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.
  • रिंकूने 2018 साली कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल (IPL) मध्ये पदार्पण केले.

Note: जर तुमच्याकडे Biography of Rinku Singh in marathi मध्ये अजून Information असेल,  जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Rinku Singh information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button